मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्बेतीविषयी मोठी अपडेट समोर ; शिंदेनी आजच्या सर्व बैठका केल्या रद्द

Eknath Shinde । राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसाच्या आरामानंतर त्यांच्या मुळगाव दरे इथून कालच ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली होती. परंतु ही बैठक पुन्हा रद्द करण्यात आली आहे. बैठक रद्द कारण्यामागे त्यांच्या तब्बेतीची कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
आमदारांसोबतची बैठकही स्थगित Eknath Shinde ।
दरम्यान, आज शपथविधीपूर्वी बोलावलेली आमदारांची बैठकही मुख्यमंत्र्यांनी स्थगित केली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यासोबतच आजच्या इतर सर्व बैठका देखील रद्द करण्यात आल्या आहेत.डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे आज सर्व बैठका रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. आज एकनाथ शिंदे ठाण्यातील निवासस्थानीच अराम करणार असल्याचे सांगणाय येत आहे.
दिल्लीतील महायुतीची बैठकदेखील लांबणीवर Eknath Shinde ।
दिल्लीतील बैठकीनंतर आज एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईत बैठक होणार होती. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे स्वीकारणार का?, एकनाथ शिंदेंनी मागितलेलं गृह खातं शिवसेनेला मिळणार का?, मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय असणार?, याबाबत चर्चा होणार होती. परंतु आज एकनाथ शिंदे यांनी सर्व बैठका रद्द केल्याने महायुतीची बैठक देखील आता लांबणीवर गेली आहे.
हेही वाचा
राज्यातील विधानसभा निकालानंतर पहिला पक्ष बदल ; ‘हा’ नेता ‘तुतारी’ सोडून हाती बांधणार ‘घड्याळ’





