Eknath Khadse । राज्यातील ज्येष्य नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या निवडणुकीविषयी मोठे विधान केले आहे. त्यांनी,”मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही, अशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी ही घोषणा केलीय. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी, “माझा भाजपमध्ये प्रवेश होईल हे विनोद तावडे यांनी सांगितले आहे, म्हणून मी निश्चिंत आहे. माझ्या भाजप प्रवेशाबद्दल गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, देवेंद्र फडणवीस या तिघांचा आता विरोध नाही. मुळात विरोध नव्हताच, त्यांचे नाराजीचे सूर होते. ती नाराजी आता दूर झाली आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण…Eknath Khadse । मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. मी अजून ही पाच वर्ष विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवारांनी सांगितले आहे की, आम्ही दिलेली वस्तू परत घेत नाही. मला शरद पवार यांनी अभय दिल्यानंतर इतर लोकं माझा विधान परिषदेचा राजीनामा मागत असतील तर मला त्याच्याशी देणंघेणं नाही. मी राजकीय माणूस आहे. मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते, मात्र, आता माझे निवडणूक लढवण्याकडे कल नाही. शरद पवारांना पक्ष सोडताना काय सांगितले, हे आता सांगणार नाही, काही गोष्टी माझ्यासाठी राखीव राहू द्या, असे त्यांनी म्हटले. रोहिणी खडसे राष्ट्रवादीचं.. मी भाजपचं काम करेन Eknath Khadse । पुढे एकनाथ खडसे म्हणाले की, भाजप मध्ये येताना मी रोहिणी खडसे यांना भाजपमध्ये येण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी नाकारले आणि शरद पवार यांच्या सोबत राहील असे सांगितले. तिला पुढची निवडणूक लढवायची आहे, तिला तिथे भविष्य दिसतेय, म्हणून ती राष्ट्रवादी शरद पवार गटात राहील. रोहिणी खडसे राष्ट्रवादीचं काम करतील. मी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचे काम करणार, असे त्यांनी म्हटले. हेही वाचा अरविंद केजरीवाल म्हणाले,”इंदोर अन् सुरतचे लोक निवडणुकीपूर्वी पळून गेले”