Eknath khadase join bjp : चार वर्षांपूर्वी खडसे यांनी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांवर आरोप करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.मात्र आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे हे स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतणार आहेत. स्वतः खडसे यांनी याबाबत खुलासा करत लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याच म्हंटल आहे.
अशात एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये आल्यास त्यांचं पद नेमकं काय असेल ? किंवा त्यांच्यावर कोणती नवी जबाबदारी सोपवली जाईल याचा सस्पेन्स मात्र अद्याप कायम आहे. खडसे हे सध्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर आमदार आहेत. आमदारकी सोडून खडसे पुन्हा भाजपमध्ये आल्यास त्यांना पक्ष आमदार करणार कि खासदार हे अद्याप स्पष्ट नाही. अशात भाजपमध्ये आल्यास खडसे यांना राज्यपाल करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. | Eknath khadase join bjp
मी पुन्हा झाल्या मूळ पक्षात म्हणेजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा खुलासा एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. त्यामुळे आगामी काळात खडसेंच्या भाजपमध्ये प्रवेश होणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं. अशात आता एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार खडसे यांना पक्ष प्रवेशानंतर राज्यपाल करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. | Eknath khadase join bjp
काय म्हणाले खडसे भाजप प्रवेशाबाबत ?
माझा भाजपप्रवेश हा दिल्लीला होणार आहे. दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्यादिवशी बोलवणं येईल त्याचदिवशी माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल. जे पी नड्डा यांची देखील भेट दिल्लीमध्ये घेतली असल्याची माहिती खडसेंनी दिली. शरद पवार यांच्याबाबत बोलताना खडसे म्हणाले,”मी शरद पवार यांचा ऋणी राहील त्यांनी मला संकटकाळात मदत केली.” | Eknath khadase join bjp
“आम्ही सत्तेत आल्यानंतर कमी दरात चांगली दारू उपलब्ध करून देऊ” ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ
लॅम्बोर्गिनी आणि डॉली चहावाला सुसाट ! Video होतोय तुफान व्हायरल..