इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट
Updated On:

नवी दिल्ली – इजिप्तचे परराष्ट्र मंत्री डॉ. बदर अब्देलअती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी गाझा शांतता करारात इजिप्तच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल राष्ट्रपती अब्दुल फत्तेह अल सिसी यांचे अभिनंदन केले.
हा करार प्रदेशात कायमची शांतता प्रस्थापित करण्यास मदत करेल,अशी आशा व्यक्त केली. परराष्ट्रमंत्री अब्देलअती यांनी पंतप्रधानांना त्यांच्या भारत भेटीदरम्यान आयोजित होणाऱ्या पहिल्या भारत–इजिप्त धोरणात्मक संवादाची माहिती दिली.
पंतप्रधानांनी व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण आणि लोकसंबंध आदी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांत होत असलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.





