नवीन पोप निवड लवकर करण्याचे प्रयत्न; जगभरातील कार्डिनलची परिषद होणार

रोम – ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू म्हणून नवीन पोप निवडण्यासाठी पुढील आठवड्यात जगभरातील कार्डिनलची परिषद होणार आहे. या परिषदेला केवळ ३ दिवस उरले असतानाही पोप पदासाठी संभाव्य व्यक्तीचे नाव पुढे येऊ शकलेले नाही.
जर रोमन कॅथोलिक कार्डिनल्सनी पुढील आठवड्याच्या कॉन्क्लेव्हच्या तिसऱ्या दिवसापर्यंत नवीन पोपची निवड केली नाही, तर नियोजधानुसार पोपची निवड होणार नाही.
जास्तीत जास्त तीन दिवसात पोपची निवड केली जाईल, असे साल्वाडोरन कार्डिनल ग्रेगोरियो रोझा चावेझ यांनी या आठवड्यात आत्मविश्वासाने भाकीत केले. दिनांक ७ मे रोजी सिस्टिन चॅपलमध्ये सुरू होणाऱ्या गुप्त मतदानापूर्वी त्यांनी हे भाकित केले आहे.
गेल्या १० कॉन्क्लेव्हचा सरासरी कालावधी ३.२ दिवसांचा होता आणि एकही कॉन्क्लेव्ह पाचपेक्षा जास्त दिवसांपर्यात चालला नाही. २००५ मध्ये जेव्हा पोप बेनेडिक्ट निवडले गेले आणि २०१३ मध्ये जेव्हा फ्रान्सिस निवडले गेले, तेंव्हाच्या गेल्या दोन निवडणुकांच्यावेळी फक्त दोन दिवसांत ही परिषद संपली होती.
एका उमेदवाराला दोन तृतीयांश बहुमत मिळेपर्यंत आवश्यक तितक्या वेळा मतदानाच्या फेऱ्यांमध्ये ही परिषद आयोजित केली जाते, चॅपेलवरील धुराड्यातून पांढरा धूर निघतो तेंव्हा नवीन पोपची निवड झाल्याचे कळते. बुधवारपासून सुरू होणाऱ्या कार्डिनलच्या परिषदेसाठी १३३ कार्डिनल उपस्थित राहणार आहेत.





