“शिक्षण आणि आरोग्य सुविधा आवाक्याबाहेर, आता व्यवसाय बनले”; सरसंघचालक मोहन भागवतांचे विधान

Mohan Bhagwat | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राबद्दल विधान केले आहे. शिक्षण आणि आरोग्य सुविधा आता सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. या दोन्ही क्षेत्रांचे व्यापारीकरण झाल्याचे त्यांनी नमूद करत सरकारला खडेबोल सुनावले आहेत. रविवारी इंदूर येथील एका कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी यावर भाष्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
ते म्हणाले, “समाजात सर्वात जास्त गरज असलेली गोष्ट म्हणजे शिक्षण आणि आरोग्य, परंतु आज या दोन्ही सुविधा स्वस्त आणि सहज उपलब्ध नाहीत. आजच्या ज्ञानाच्या युगात शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी माणूस आपले घर विकू शकतो, पण आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे, आरोग्यासाठीही माणूस आपली संपूर्ण बचत खर्च करण्यास तयार असतो जेणेकरून त्याला चांगल्या ठिकाणी उपचार मिळावे.”
भागवत पुढे म्हणाले की, “शाळा आणि रुग्णालयांची संख्या वाढत आहे, हे खरे आहे, पण विचार केला तर ते हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जातात. कारण पूर्वी शिक्षण आणि आरोग्य हे सेवाकार्य मानले जात होते, आता त्याला व्यवसायाचे स्वरूप देण्यात आले आहे. शिक्षण आणि आरोग्य हे व्यवसाय बनले की ते सामान्य माणसाच्या आर्थिक क्षमतेच्या पलीकडे जात आहेत.” Mohan Bhagwat |
देशात सध्या वाढत्या शाळांच्या फी आणि रुग्णालयाचे न परवडणारा खर्च चिंताजनक विषय आहे. याचदरम्यान, मोहन भागवत यांनी केलेल्या या विधानानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. Mohan Bhagwat |
हेही वाचा :
Election Commission : ‘गिरे तो भी टांग उपर’, आयोग नेमकं काय लपवतंय; रोहित पवारांचा सवाल





