Oil Price Hike : मोठी बातमी..! खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका, जाणून घ्या आताचे दर
Oil Price Hike : आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला असून, त्याचे पडसाद स्थानिक बाजारातही उमटत आहेत. यामुळे खाद्यतेलासह इतर इंधनांच्या दरात वाढ होत आहे.

Oil Price Hike : नंदुरबार जिल्ह्यात खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली असून, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. गेल्या महिन्याभरात १५ लिटरच्या तेलाच्या डब्याची किंमत तब्बल ३०० रुपयांनी वाढून २१०० रुपयांवरून २५०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. Oil Price Hike
आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला असून, त्याचे पडसाद स्थानिक बाजारातही उमटत आहेत. यामुळे खाद्यतेलासह इतर इंधनांच्या दरात वाढ होत आहे. Oil Price Hike
दरम्यान, लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने खाद्यतेलाची मागणी वाढलेली आहे. अशा वेळीच दरवाढ झाल्याने लग्नसमारंभांच्या खर्चात मोठी वाढ झाली असून आयोजकांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. नागरिकांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. Oil Price Hike

Oil Price Hike : खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका, जाणून घ्या आताचे दर
युद्धजन्य परिस्थिती कायम राहिल्यास येत्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण असून ग्राहकांची खरेदी कमी होत असल्याचेही व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. Oil Price Hike
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या तणावाबाबत संकेत देत ९ एप्रिल २०२६ पर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर गॅस, पेट्रोल आणि खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतीमुळे भारतातील नागरिकांमध्येही चिंता वाढली आहे.

