महुआ मोईत्रा यांना ईडीचे नव्याने समन्स
Updated On:

Mahua Moitra : तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा सोमवारी चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे ईडीने त्यांना नव्याने समन्स बजावले. महुआ यांना ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी आठवडाभराची मुदत दिली आहे.
परकी चलन व्यवस्थापन कायद्याचा (फेमा) भंग केल्याच्या आरोपावरून ईडीला महुआ यांची चौकशी करायची आहे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून महुआ वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. त्यावरून त्यांची खासदारकी रद्द झाली.
लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी समुहाला लक्ष्य करण्यासाठी महुआ यांनी प्रश्न विचारले. ती कृती त्यांनी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्या निर्देशावरून केली.
त्यासाठी त्यांना भेटवस्तू मिळाल्या, असा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला. मात्र, कुठले गैरकृत्य केल्याचा इन्कार महुआ सातत्याने करत आहेत.





