पंजाबमधील AAP खासदार संजीव अरोरा यांच्या घरावर EDचा छापा

नवी दिल्ली – पंजाबमधील लुधियाना येथील आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजीव अरोरा यांच्या निवासस्थानावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज झडती घेतली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे छापे मनी लाँड्रिंगच्या चौकशी प्रकरणी टाकण्यातआले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपचे राज्यसभा खासदार अरोरा यांच्यावर त्यांच्या कंपनीच्या नावावर करोडोंची जमीन फसवणूक केल्याचा आरोप आहे.
ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना, अरोरा म्हणाले की शोध मोहिमेच्या कारणाविषयी त्यांना निश्चित कसली माहिती नाही. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे, शोध मोहिमेच्या कारणाविषयी मला खात्रीपूर्वक काही सांगता येत नाही. तथापि, तपास संस्थांना पूर्ण सहकार्य करेल आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देईन असे त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
तपास संस्थेने लुधियाना, जालंधर आणि दिल्लीतील 17 ठिकाणी छापे टाकले, ज्यात रिअल इस्टेट क्षेत्रातील हेमंत सूद यांच्या निवासस्थानाचा समावेश आहे. वरिष्ठ आप नेते मनीष सिसोदिया यांनी या छाप्यांवरून ईडीवर हल्ला चढवला आहे. ईडीने त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांवर छापे टाकले आहेत परंतु काहीही सापडले नाही.
आज सकाळी आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांच्या घरावर ईडी छापा टाकते आहे. त्यांनी गेल्या दोन वर्षांत अरविंद केजरीवाल, संजय सिंह यांच्या घरावर छापे टाकले आहेत. दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावरही छापे टाकले गेले, मात्र त्यांना कुठेही काहीच मिळाले नाही असे सिसोदिया यांनी म्हटले आहे.





