नवी दिल्ली – नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडीने कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना नोटीस बजावली असून 21 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी राहूल गांधी यांची ईडीने पाच दिवसांमध्ये तब्बल 50 तासांहून अधिक चौकशी केली आहे.
सोनिया गांधी यांना याआधीच नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार, त्यांना 8 जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्यावेळी त्यांना करोनाची लागण झाल्याने त्या चौकशीसाठी हजर राहू शकल्या नाहीत.
पक्षचिन्ह वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे धाव; केली ‘ही’ महत्वाची मागणी
तसेच त्यांना पोस्ट कोविडचाही त्रास झाल्याने त्यांनी 4 आठवड्यांची मुदत मागितली होती. ही मुदत 22 तारखेला संपणार असल्याने ईडीने 21 जुलैचीच नोटीस दिली आहे.