जास्त मीठ खाल्ल्याने आयुर्मानात घट, पुरुषांचे आयुष्य दोन वर्षांनी तर महिलांचे आयुष्य दीड वर्षांनी होते कमी

लंडन – साधारणपणे सर्वच लोकांच्या दैनंदिन आहारातील अविभाज्य भाग असलेल्या मीठा अभावी आयुष्य आळणी होत असले तरी याच मीठाच्या अतिरेकी वापरामुळे माणसाच्या आयुर्मानातही घट होत असल्याचे समोर आले आहे नुकत्याच झालेल्या एका संशोधनाप्रमाणे मिठाच्या अतिरिक्त वापरामुळे पुरुषांचे आयुष्य दोन वर्षांनी तर स्त्रियांचे आयुष्य दीड वर्षांनी कमी होते ब्रिटनमधील 50 च्या आसपास वय असणाऱ्या सुमारे पाच लाख लोकांवर नऊ वर्षे संशोधन केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
ज्या लोकांनी आपल्या आहारामध्ये खूपच कमी मिठाचा वापर केला आहे आणि आहारात जेवण करताना नंतरही वरून मीठ वापरलेले नाही अशा लोकांना ज्यांनी जास्त मिठाचा वापर केला आहे त्यांच्या पेक्षा जास्त आयुष्य मिळते असे या संशोधनात म्हटले आहे आहारात अतिरिक्त मिठाचा वापर करणाऱ्यांना लवकर मरण्याचा 28 टक्के जास्त धोका असतो दैनंदिन आहारातील पदार्थ तयार केल्यानंतर जेवण करत असताना त्यामध्ये पुन्हा एकदा मीठ घालण्याची अनेकांना सवय असते हे अतिरिक्त मीठ घातक ठरू शकते असा संशोधकांचा दावा आहे.
अशा प्रकारचे संशोधन प्रथमच करण्यात आल्याची माहिती अमेरिकेतील न्यू ओर्लिन्समधील तुलँड युनिव्हर्सिटी स्कुलमधील संशोधकांनी दिली आहे ब्रिटनमधील ज्या पाच लाख लोकांवर नऊ वर्ष संशोधन करण्यात आले त्यांच्या आहारावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होते आहार घेत असताना ते अतिरिक्त मीठ वापरत होते का यावरही लक्ष ठेवण्यात येत होते आणि त्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे अन्नपदार्थ तयार करताना प्रमाणात मीठ वापरणे योग्य असले तरी त्या अन्नपदार्थाचा आस्वाद घेत असताना नव्याने पुन्हा अतिरिक्त मीठ वापरु नये असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे





