Salt Saved The Lives : जेवणातील मीठ ठरलं संजीवनी..! पहलगाम हल्ल्यात कसा वाचला संपूर्ण कुटुंबाचा जीव; स्वतः सांगितला थरारक अनुभव

मुंबई : कधी कधी एक छोटीशी घटना काय चमत्कार घडवू शकते याचा प्रत्यय केरळमधील एका कुटुंबाला (Salt Saved The Lives) आहे. ही घटना काश्मीरच्या पहलगाम घटनेशी संबंधीत आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेबद्दल देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यादरम्यान बचावलेल्या एका कुटुंबाने आपली आपबिती सांगितली कि कसे मिठामुळे त्यांचे प्राण वाचले.
मिठाने वाचवला कुटुंबाचा जीव (Salt Saved The Lives)
कोच्ची येथील अल्बी जॉर्ज, त्यांची पत्नी लावण्या, त्यांचे मुलं, सासू-सासरे आणि काही इतर नातेवाईक 18 एप्रिल रोजी काश्मीरच्या सहलीसाठी निघाले होते. 19 एप्रिलला श्रीनगरला पोहोचून त्यांनी गुलमर्ग आणि सोनमर्गची सफर केली. 20 एप्रिलच्या सकाळी पहलगामला जाण्याचा बेत होता. पण दोन दिवस सतत फिरण्यात गेल्यामुळे त्यांनी २ दिवस सकाळच जेवण केले नव्हते. त्यामुळे त्यांनी पहलगामला निघण्याआधी एक ढाब्यावर थांबून काही खाण्याचं ठरवलं.
यानंतर ते एका रस्त्याकडच्या ढाब्यावर थांबले आणि फ्राइड राईस मागवला. पण जेवणात इतकं मीठ होतं की ते खाणं अशक्य झालं. त्यानंतर अल्बीने ढाबेवाल्याशी वाद घातला. ढाबेवाला पुन्हा फ्राईड राईस बनवायला तयार झाला आणि त्यात जवळपास एक तास गेला. आणि हाच एक तास या कुटुंबाच्या आयुष्यासाठी मौल्यवान ठरला.
जेवण झाल्यावर ते कुटुंब बाइसारनच्या दिशेने निघाले. पण दोनच किलोमीटर पुढे गेल्यावर काही तरी विचित्र वाटू लागलं. समोरून घोडे, गाड्या, पर्यटक आणि स्थानिक लोक वेगाने परत येत होते. त्यांच्या आवाजात भीती होती. एक गुजराती कुटुंब गाडीतून पुढे आलं आणि त्यांनी सांगितलं “आगे मत जाओ, कुठ तो हुआ है.” यानंतर अल्बी जॉर्ज यांनी कुटुंबासह माघारी परतण्याचा निर्णय घेतला.
घाटीत परत आल्यावर त्यांनी थोडा वेळ झऱ्याजवळ घालवला. पण सायंकाळी साडेचारच्या सुमारास दुकानं बंद व्हायला लागली. स्थानिक लोक म्हणाले की, “होटलमध्ये परत जा, परिस्थिती बिघडणार आहे.” कुटुंब हॉटेलमध्ये परत आलं. यानंतर त्यांना नातेवाईकांचे फोन यायला लागले आणि मग त्यांना समजलं हलगाम परिसरात मोठा आतंकी हल्ला झाला आहे.
जर जेवणात मीठ जास्त पडलं नसत तर…
जेवणात मीठ जास्त (Salt Saved The Lives) पडल्यामुळे ह्या कुटुंबाला पहलगाम येथे पोहोचायला उशीर झाला. पण जर हेच कुटुंब १ तास आधी पहलगाममध्ये पोहोचले असते तर काय झाले असते.. ? याचा विचार न केलेलाच बरा.. बोलतात ना देव तारी त्याला कोण मारी. आपल्या आयुष्यात काही घटना या उगाच घडत नसतात. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असते.. याचा प्रत्यय तुम्हाला या घटनेवरून आलाच असेल…





