Ishan Kishan : दुलीप ट्रॉफीपूर्वी ईस्ट झोनला मोठा धक्का! इशान किशन स्पर्धेतून बाहेर, अभिमन्यू ईश्वरनकडे नेतृत्व

Ishan Kishan Ruled Out of Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफी 2025 ची सुरुवात 28 ऑगस्टपासून होणार आहे. मात्र, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच ईस्ट झोन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार इशान किशन आणि वेगवान गोलंदाज आकाश दीप यांना या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे. ईशान किशनच्या अनुपस्थितीत बंगालचा ज्येष्ठ फलंदाज अभिमन्यू ईश्वरन याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
इशानच्या जागी आशीर्वाद स्वॅनची निवड –
इशान किशनच्या जागी ओडिशाचा यष्टिरक्षक-फलंदाज आशीर्वाद स्वॅन याला संघात स्थान देण्यात आले आहे. ओडिशा क्रिकेट असोसिएशनने एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. याशिवाय, संदीप पटनायक हा देखील संघाचा हिस्सा असेल, तर स्वास्तिक सामल याला स्टँडबाय खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. इशान किशनच्या दुखापतीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Odisha’s wicketkeeper-batter Aashirwad Swain has been selected for the East Zone squad in the Duleep Trophy, replacing Ishan Kishan! 🏏🔥
He joins Sandeep Pattnaik in the squad, while Swastik Samal has been named as standby. 👏✨#odishacricketassociation #duleeptrophy #eastzone… pic.twitter.com/tgffJry9PU— Odisha Cricket Association (@cricket_odisha) August 17, 2025
अँडरसन-तेंडुलकर मालिकेदरम्यान त्याच्या पायाला टाके पडल्याची बातमी समोर आली होती, ज्यामुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्यात आले नव्हते. हीच दुखापत त्याच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचे कारण आहे की अन्य काही, याबाबत स्पष्टता नाही. तसेच, टी-20 आशिया चषकासाठी त्याची निवड होण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे. आशिया चषकासाठी सूर्यकुमार यादव 19 ऑगस्ट रोजी निवड समितीशी चर्चा करणार आहे, त्यानंतर संघाची घोषणा होईल.
हेही वाचा – बुमराह-शमीचे पर्याय शोधण्यात BCCI व्यस्त, वेगवान गोलंदाजांसाठी खास शिबिराचे केले आयोजन, पाहा VIDEO
आकाश दीपही स्पर्धेतून बाहेर –
इशान किशनपूर्वी आकाश दीपलाही दुलीप ट्रॉफीमधून बाहेर व्हावे लागले आहे. त्याच्या बाहेर पडण्याचे कारणही अद्याप अस्पष्ट आहे, परंतु इंग्लंड दौऱ्यावरील पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान त्याला फिटनेसच्या समस्यांचा सामना करावा लागला होता. याच कारणामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला असावा, असे मानले जात आहे. आकाश दीपच्या जागी मुख्तार हुसैन याला संघात सामील करण्यात आले आहे.
हेही वाचा – Yuvraj Singh Sister : युवीच्या बहिणीची भारतीय संघात निवड! कोण आहे एमी ऊर्फ अमरजोत? जाणून घ्या
दुलीप ट्रॉफी 2025 साठी ईस्ट झोन संघ : अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार) संदीप पटनायक, विराट सिंग, दानिश दास, श्रीदम पॉल, शरणदीप सिंग, कुमार कुशाग्र, रियान पराग, उत्कर्ष सिंग, मनीषी, सूरज सिंधु जैस्वाल, मुकेश कुमार, मुख्तार हुसैन, मोहम्मद शमी, आशीर्वाद स्वॅन
स्टँडबाय खेळाडू: वैभव सूर्यवंशी, स्वास्तिक सामल, सुदीप कुमार घरामी, राहुल सिंग





