Earthquake Delhi : दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरला; रिष्टर स्केलवर ५.९ तीव्रता
Earthquake Delhi : शुक्रवारी रात्री ९:४५ वाजता दिल्ली, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. ५.९ तीव्रतेच्या या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
Updated On:

Earthquake Delhi : देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारताचा काही भाग शुक्रवारी रात्री भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.९ इतकी नोंदली गेली.
सुदैवाने, त्यामध्ये कुठलीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला.
दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील काही भाग भूकंपामुळ काही सेकंद थरथरले. तो धक्का जाणवलेल्यांमध्ये घबराट पसरली. त्यातून अनेकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून घरांमधून बाहेर पडून मोकळ्या जागी धाव घेतली.
भूकंपाच्या केंद्रबिंदूची नोंद अफगाणिस्तानात जमिनीखाली सुमारे १५० किलोमीटर अंतरावर झाली. त्यामुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे काही भागही हादरले.





