Eknath Shinde : राजकारणात मोठा भूकंप? ठाकरेंचे खासदार शिंदेसेनेच्या डिनरला हजर, ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा, फोटो आले समोर
Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या दोन खासदारांनी डिनर डिप्लोमसिला हजेरी लावल्याने पुन्हा एकदा अॅापरेशन टायगरची चर्चा होत आहे.

Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली होती.
अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डिनेर डिप्लोमसीला शिवसेना ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी उपस्थिती दर्शवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी डिनर आयोजित केले होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख उपस्थित होते. त्यामुळे अॅापरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
एकीकडे महाराष्ट्रात अॅापरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी शिंदेंच्या केंद्रीय मंत्र्यांच्या डिनर डिप्लोमसीला हजेरी लावल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर या दोन खासदारांचे डिनरला हजेरी लावल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
ठाकरेंचे खासदार नागेश आष्टीकर म्हणाले…
शिवसेना शिंदेंचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम होता. त्यांनी आम्हाला सभागृहामध्ये विनंती केली होती. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी घरी गेलो होतो, असे स्पष्टीकरण ठाकरेंचे खासदार नागेश आष्टीकर यांनी दिले.
तुतारीचे 6 खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फोडण्याची एकनाथ शिंदेची खेळी होती. अशी चर्चा होत आहे. ही कमया प्रत्यक्षात साकार झाल्यास शिंदेंचे बळ वाढले असते आणि एकूण खासदारांची संख्या 19 वर गेली असते. परंतु भाजपकडून एकनाथ शिंदेंच्या या अॅापरेशन टायगर आणि तुतारीला अद्याप ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे.
संजय राऊतांचा मोठा दावा
उद्धव ठाकरेंचे दोन खासदार डिनरला उपस्थित राहिल्याने चर्चांण उधाण आले असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा भूंकप होण्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेनेतील अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा : Maharashtra Politics: “२५ ते ३० आमदारांसह राष्ट्रवादी पक्ष भाजपमध्ये विलीन होणार”; नेमका कोणी केला दावा ?





