Earthquake : हिमाचलमध्ये भूकंपाचे धक्के ! ३.३ रिश्टर स्केलची तीव्रता
Updated On:

Earthquake – हिमाचल प्रदेश मंडी शहरात मंगळवारी दुपारी १२.०१ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.3 इतकी मोजली गेली.
जमिनीखाली त्याची खोली 5 किलोमीटर होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या (एनसीएस) मते, मंडी, हिमाचल प्रदेश येथे दुपारी १२.०१ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले. मात्र, भूकंपाची तीव्रता कमी असल्याने बहुतांश लोकांना ते जाणवू शकले नाहीत.
मंडी जिल्ह्यातील बहुतांश भाग झोन 5 मध्ये येतात, जे भूकंपाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे येथे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात.





