Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’च्या ग्रँड फिनालेपूर्वी मोठा ट्वीस्ट; ‘हे’ ठरले टॉप 5 स्पर्धक
Bigg Boss Marathi 6: रेवा कौरसेचा प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन संपला.

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’चा ग्रँड फिनाले आता लवकरच होणार आहे. त्यापूर्वी शोमध्ये ट्वीस्ट पाहायला मिळाला. नुकतेच घरातून एका सदस्याला एलिमिनेट करण्यात आलं आहे. महाअंतिम सोहळा अगदी जवळ आला असतानाच घरात घडलेल्या एका धक्कादायक घडामोडीनं स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही आश्चर्यचकित केलं. टॉप 6 मध्ये पोहोचलेल्या एका दमदार स्पर्धकाचा प्रवास फायनलच्या उंबरठ्यावरच थांबला
गेल्या आठवड्या राखी सावंत एलिमिनेट झाल्यानंतर ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखने याआधीच, काहीतरी वेगळं आणि अनपेक्षित घडणार असल्याचा इशारा दिला होता. तोच धक्का बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना कालच्या एपिसोडमध्ये मिळाला. Bigg Boss Marathi 6
एका खेळानंतर राकेश बापट हा या सिझनमधील दुसरा फायनलिस्ट ठरला, तर त्याच्या पाठोपाठ अनुश्री तिसरी फायनलिस्ट झाली. मात्र, दुर्दैवानं वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात आलेल्या रेवा कौरसेचा प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन संपला. रेवा कौरसे बाहेर गेल्याची घोषणा होताच, घरातील सर्व स्पर्धक भावुक झाले.
मात्र रेवा कौरसे घराबाहेर गेल्यानंतर आता ‘बिग बॉस मराठी सीझन 6’चे टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद आणि विशाल कोटियान हे आता टॉप 5 सदस्य असणार आहेत. आता एक स्पर्धक आता ‘बिग बॉस मराठी 6’च्या ट्रॉफीचा मानकरी ठरणार आहे. Bigg Boss Marathi 6
हेही वाचा:






