Jahnavi Killekar : “…एकतर माती खाऊन बाहेर येता”; जान्हवी किल्लेकर रुचितावर संतापली
Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरने व्हिडिओ शेअर करत रुचिताला चांगलेच सुनावले

Jahnavi Killekar : ‘बिग बॉस मराठी’ ६ च्या पर्वात नवंनवे ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. अलीकडेच रुचिता जामदारची या घरातून बाहेर पडली. यावेळी तिने काही मुलाखतींमध्ये ‘बिग बॉस मराठी’ शोबाबत काही आरोप लावले.
यावरून जान्हवी किल्लेकरने व्हिडिओ शेअर करत रुचिताला चांगलेच सुनावले आहे. व्हिडिओमध्ये जान्हवीने, ‘तु शोमधील सदस्यांबद्दल काहीही बोल पण, बिग बॉस आणि रितेश सरांविरोधात चुकीचं बोलू नकोस, ते खपवून घेतलं जाणार नाही असं स्पष्ट मत मांडलं आहे.
जान्हवी या व्हिडीओमध्ये म्हणते, आज मला तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या महाराष्ट्रात आज अनेक क्रिएटर्स आहेत, अभिनेते आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांना मनापासून बिग बॉसच्या घरात जायचंय. बिग बॉसमध्ये एकदा तरी जाता यावं यासाठी हे लोक धडपड करताहेत, रडत आहे.
एकदा तरी आम्हाला शोमध्ये घ्या इतकंच त्यांचं म्हणणं आहे. कारण, बिग बॉस या शोचं नाव खूप मोठं आहे. या शोमध्ये जाण्यासाठी लोक काहीही करू शकतात. पण, ज्या लोकांना या शोमध्ये जाण्याची संधी मिळते. या संधीचं सोनं करायचं सोडून तुम्ही आतमध्ये एकतर माती खाऊन बाहेर येता. ज्या शोमुळे आपल्याला इतक्या गोष्टी मिळाल्या. Jahnavi Killekar
View this post on Instagram
आपलं सगळीकडे नाव झालं, चर्चा झाली. निदान त्या शोबद्दल तरी वाईट बोलू नका. तुम्ही घरातील सदस्यांबद्दल बोला…बाकीचं बोला. पण, बिग बॉस शोबद्दल आणि रितेश सरांबद्दल तुम्ही असं काहीही बोलू शकत नाही. रितेश सर अत्यंत चांगले माणूस आहेत.
आता तुम्हाला समजलं असेलच की मी कोणाबद्दल बोलतेय. खरंतर नाव घ्यायला काहीच हरकत नाही, मी रुचिताबद्दल बोलतेय. ती घराबाहेर आल्यावर बिग बॉसबद्दल जे काही बोलतेय ते चुकीचं आहे. चुका प्रत्येकाकडून होतात, राग येतो, शब्द चुकतात.
मी स्वत: सुद्धा त्या सगळ्या चुका केलेल्या आहेत. मी कोणावर काही टिपण्णी करणार नाही. आता तिचं म्हणणं असं आहे की, बिग बॉसने मला चुकीचं दाखवलं. आता त्यांना तुला चुकीचं दाखवून काय मिळणार? जे तू आतमध्ये करणार ते ‘बिग बॉस’ दाखवणार. Jahnavi Killekar
आमच्या सीझनला मला सर्वात जास्त ओरडा मिळाला, मला शिक्षा सुद्धा झाली होती. पण, आजपर्यंत कधीही मी बिग बॉसला नावं ठेवलेली नाहीये किंवा रितेश सरांकडे नजर वर करून सुद्धा पाहिलेलं नाही. कारण, ते या शोचे होस्ट आहेत. इतका मोठा व्यक्ती आपल्याशी बोलतोय…हीच खूप मोठी गोष्ट आहे.
तुम्ही काहीही करा पण, या शोला नावं ठेवू नका. मला या शोने खूप काही दिलं. मी यापूर्वी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं होतं. पण, संपूर्ण महाराष्ट्रात माझी ओळख निर्माण झाली बिग बॉसमुळे. यामुळे मला The 50 शोमध्ये जायची सुद्धा संधी मिळाली. त्यामुळे मी आता घराबाहेर येणाऱ्या सदस्यांना इतकंच सांगेन. Jahnavi Killekar
तुम्ही काहीही बोला पण, शोच्या विरोधात बोललात तर मी खपवून घेणार नाही आणि रितेश सरांच्या विरोधात तर अजिबातच बोलायचं नाही, असा थेट इशारा जान्हवीने दिला आहे. Jahnavi Killekar
हेही वाचा:





