Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनचे मराठी चित्रपटात पदार्पण; महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार
Abhishek Bachchan : ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात अभिषेक बच्चन हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजी शहाजी राजे भोसले यांची भूमिका साकारत आहेत. त्याच्या या भूमिकेमुळे इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय नव्या पिढीसमोर भव्य स्वरूपात साकारला जाणार आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ या सिनेमाच्या दमदार ‘फर्स्ट लूक टीझर’मध्ये अभिषेक बच्चन एका पूर्णपणे वेगळ्या आणि प्रभावी लूकमध्ये दिसून आला.
योद्ध्याचा साज चढवलेला पेहराव, रणांगणावरची त्यांची दमदार उपस्थिती आणि बंधुप्रेमाची झलक दाखवणारा भावनिक आविष्कार यामुळे हा टीझर प्रेक्षकांना भारावून गेला.
या चित्रपटात अभिषेक बच्चनसह संजय दत्त, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि स्वतः रितेश विलासराव देशमुख यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.
‘जिओ स्टुडिओज’द्वारे सादर करण्यात आलेला आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’च्या बॅनरखाली ज्योती देशपांडे व जिनिलिया देशमुख यांनी निर्मित केलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
MLA T Raja Singh : “एका एका घरात पाच पाच बंदूक…”; भाजप आमदाराचे चिथावणीखोर वक्तव्य






