Durga Mata Daud : श्रीरामपुरात 11 ऑक्टोबरपासून ‘दुर्गामाता दौड’ ला सुरुवात
श्रीरामपूर येथे ‘दुर्गामाता दौड’ या (Durga Mata Daud) उपक्रमाचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानतर्फे करण्यात आले आहे. रविवार, ११ ऑक्टोबरपासून मंगळवार, २० ऑक्टोबरपर्यंत दररोज पहाटे ५.३० वाजता शहरातील विविध भागांतून दौड काढण्यात येणार आहे.

Durga Mata Daud : श्रीरामपूर येथे ‘दुर्गामाता दौड’ या (Durga Mata Daud) उपक्रमाचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानतर्फे करण्यात आले आहे. रविवार, ११ ऑक्टोबरपासून मंगळवार, २० ऑक्टोबरपर्यंत दररोज पहाटे ५.३० वाजता शहरातील विविध भागांतून दौड काढण्यात येणार आहे.
११ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयाजवळील सूर्यमुखी हनुमान मंदिरापासून वढणे वस्तीपर्यंत दौडीने (Durga Mata Daud) उपक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी इंदिरानगर, १३ रोजी खिलारी वस्ती, १४ रोजी सरस्वती कॉलनी, १५ रोजी बेलापूर रोड, १६ रोजी नगरपालिका परिसर, १७ रोजी सुवर्ण पिंपळ मोरगे वस्ती, १८ रोजी मोहटा परिसर आणि १९ रोजी कुमावत नगर येथून दौड काढण्यात येणार आहे.
२० ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या निमित्ताने गोंधवणी येथून वढणे वस्तीपर्यंत महादौड (Durga Mata Daud) काढून उपक्रमाची सांगता होणार आहे. या उपक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






