Nevase News : गोगलगाववर नाना पाटेकरांचे पितृत्वाचे प्रेम; ५८ कुटुंबांना शौचालये, १० लाखांचे फिल्टर युनिट उभारले
Nevase News : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वप्रथम एखाद्या खेडेगावात नाना पाटेकर आले असतील, तर ते गोगलगावमध्ये. एकदा नव्हे, तर चार वेळा त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र मल्हार पाटेकर आणि मार्गदर्शक गुरुजी मुळे हे देखील गावात आले होते.

नेवासे : “नाना म्हणजे फक्त अभिनेता नाही, तर आमच्यासाठी एक पितृतुल्य व्यक्ती”, आहे शब्दांत सांगता न येणारी ही भावना गोगलगावचे माजी सरपंच योगेश मस्के यांनी व्यक्त करत आदर्शगाव गोगलगावच्या जडणघडणीत नाना पाटेकर यांचे योगदान शब्दांत मोजता येणार नसल्याचे सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वप्रथम एखाद्या खेडेगावात नाना पाटेकर आले असतील, तर ते गोगलगावमध्ये. एकदा नव्हे, तर चार वेळा त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र मल्हार पाटेकर आणि मार्गदर्शक गुरुजी मुळे हे देखील गावात आले होते.
५८ कुटुंबांसाठी शौचालये : शासनाच्या यादीत नाव होते, लाभ मिळाल्याचे कागदावर दाखवले होते, पण प्रत्यक्षात अनेकांच्या घरी शौचालयच नव्हते हे वास्तव नाना पाटेकर यांनी पाहिले आणि स्वखर्चातून ५८ कुटुंबांसाठी शौचालये बांधून दिले.
१० लाखांचे वॉटर फिल्टर युनिट : गावातील प्रत्येक नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी १० लाख रुपये खर्चाचे आधुनिक वॉटर फिल्टर युनिट त्यांनी दिले. त्यासाठी लागणारी स्वतंत्र खोली सुद्धा त्यांनीच बांधून दिली.
मंदिर-मशिद एकत्र आणि गुरुजींच्या तोंडून नमाज…
गोगलगावचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर आणि मशीद समोरासमोर आहे. एका कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गुरुजी मुळे यांनी सर्वधर्म समभावाचा संदेश देत भर सभेत नमाज पठण केले होते, हा क्षण आजही ग्रामस्थांच्या लक्षात आहे.
योगेश मस्के यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन नाना पाटेकर यांनी त्यांना नाम फाउंडेशनमध्ये काम करण्याची मोठी संधी दिली. “गोगलगाव आणि योगेश मस्के यांच्यावर नानाजींचे विशेष प्रेम होते. दरवर्षी गणपतीला आरतीसाठी योगेश म्हस्के यांना ते आवर्जून मुंबईला बोलावत असत. आज ते आपल्यात नाहीत, त्यांच्या जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच आम्ही काम करत राहू अशी भावना यावेळी भावना योगेश मस्के यांनी व्यक्त केली. नानाजींच्या या प्रेमामुळेच आज गोगलगाव स्वच्छ, सुंदर आणि आदर्शगावं म्हणून देशभरात ओळखले जावू लागले असे देखील ते म्हणाले.





