Asia Cup 2025 सामन्यादरम्यान दुनिथ वेल्लालगेवर कोसळला दु:खाचा डोंगर, क्रिकेटविश्व हळहळले!

Dunith Wellalage’s father dies : आशिया कप 2025 च्या 11व्या सामन्यादरम्यान श्रीलंकेचा युवा अष्टपैलू खेळाडू दुनिथ वेल्लालगेवर दुखाचा डोंगर कोसळला. त्याचे वडील माजी क्रिकेटपटू सुरंगा वेल्लालगे यांचे वयाच्या 54 व्या वर्षी कोलंबो येथे 18 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन. ही दु:खद बातमी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यानंतर दुनिथला समजली. यानंतर तो तातडीने यूएईहून श्रीलंकेला रवाना झाला.
वेल्लालागेच्या कुटुंबावर कोसळला दुखाचा डोंगर –
आता वेल्लालगेच्या कुटुंबाला या दु:खद प्रसंगातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना क्रिकेटविश्वातून होत आहे. 22 वर्षीय दुनिथला ही बातमी सपोर्ट स्टाफकडून समजली, तेव्हा तो भावूक झाला. सपोर्ट स्टाफच्या सदस्यांनी त्याला सांभाळले. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुनिथची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. त्याने 4 षटकांत 49 धावा दिल्या आणि केवळ एक गडी बाद केला. विशेष म्हणजे, या सामन्यात अफगाणिस्तानचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबीने दुनिथच्या एका षटकात तब्बल 5 षटकार ठोकले.
दुनिथसाठी 18 सप्टेंबरचा दिवस ठरला वाईट –
Life is unpredictable 💔
May God give him and his entire family strength to cope during this difficult time.
Stay strong, Dunith Wellalage. 🤍#DunithWellalage pic.twitter.com/7iTQt0gWJL
— Saabir Zafar (@Saabir_Saabu01) September 19, 2025
सामन्यानंतर जेव्हा मोहम्मद नबीला दुनिथच्या वडिलांच्या निधनाची बातमी समजली, तेव्हा त्याला विश्वासच बसला नाही. नबीने दुनिथच्या एका षटकात 5 षटकार मारले होते, पण त्याला या वैयक्तिक दु:खाची माहिती नव्हती. दुनिथसाठी 18 सप्टेंबर हा दिवस मैदानात आणि वैयक्तिक आयुष्यातही अत्यंत कठीण ठरला.
श्रीलंकेने जिंकला सामना –
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने विजयी मालिका कायम ठेवत 6 गडी राखून विजय मिळवला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 8 गडी गमावून 169 धावा केल्या. यात मोहम्मद नबीने 60 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून नुवान तुषाराने 4 गडी बाद केले.
हेही वाचा – Mohammad Nabi : मोहम्मद नबीने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू!
170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने 74 धावांची शानदार खेळी करत संघाला 18.4 षटकांत विजय मिळवून दिला. या विजयासह श्रीलंकेने लीगमधील तिन्ही सामने जिंकले आहेत. सुपर-4 मध्ये श्रीलंका 20 सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे.





