Duleep Trophy 2025 : वेस्ट झोनच्या कर्णधारपदी शार्दुल ठाकूरची वर्णी! रहाणे-पुजाराला मिळाले नाही स्थान

वेस्ट झोनच्या संघात शार्दुल ठाकूरच्या कर्णधारपदाखाली यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, सर्फराझ खान, ऋतुराज गायकवाड आणि तुषार देशपांडे यांचा समावेश आहे. मात्र, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना संघात स्थान न मिळाल्याने त्यांच्यासाठी दुलीप ट्रॉफीचे दरवाजे सध्या बंद झाल्याचे दिसते. भविष्यात त्यांना संधी मिळेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
28 ऑगस्टपासून स्पर्धेला होणार सुरुवात –
दुलीप ट्रॉफी 2025 चा पहिला सामना 28 ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. पहिल्या दिवशी नॉर्थ झोन आणि ईस्ट झोन यांच्यातील लढत होईल. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबरला खेळला जाईल. सर्व संघ एकमेकांविरुद्ध कसोटी स्वरूपात खेळताना दिसतील.
साउथ झोनचे कर्णधारपद तिलक वर्माकडे –
यापूर्वी साउथ झोनच्या संघाची घोषणा झाली असून, तिलक वर्माला कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या संघात मोहम्मद अजहरुद्दीन (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), तन्मय अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, आर. साई किशोर, रिकी भुई यांसारखे दिग्गज खेळाडू आहेत. आयपीएलमध्ये चमक दाखवणारे हे खेळाडू आता भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आपली दावेदारी पेश करतील.
वेस्ट झोनचा संघ : शार्दुल ठाकूर (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, सरफराज खान, ऋतुराज गायकवाड, तुषार देशपांडे.
साउथ झोनचा संघ : तिलक वर्मा (कर्णधार), मोहम्मद अझरुद्दीन (उपकर्णधार, यष्टीरक्षक), तन्मय अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, मोहित काले, सलमान निजार, एन. जगदीसन (यष्टीरक्षक), टी. विजय, आर. साई किशोर, तनय त्यागराजन, विशाक विजयकुमार, एमडी निधिश, रिकी भुई, बासिल एनपी, गुरजापनीत सिंह, स्नेहल कौथंकर.





