कराडमधील आंदोलनामुळे महामार्गावरील उंब्रजमध्ये एसटी बसेस थांबवल्या
Updated On:

उंब्रज – कराड येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे- बंगळुरू महामार्गावर उंब्रज येथे एसटी महामंडळाच्या सर्व बस थांबवण्यात आल्या आहेत.
जालना येथील आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर कराड येथे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने दुपारी बाराच्यादरम्यान आंदोलन सुरु झाले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उंब्रज बस स्थानक व महामार्गावर बसेस थांबवून ठेवण्यात आल्या. खासगी वाहतूक सुरु होती.





