Pune | दाट धुक्यामुळे विमानांना उशीर

पुणे, – दिल्लीसह उत्तरेत पडणाऱ्या दाट धुक्यमुळे काही विमांनाना फटका बसत आहे. त्यात मंगळवारी सकाळी जयपूरहून पुण्याला येणाऱ्या स्पाइस जेटच्या विमानाला साडेचार तास उशीर झाला. हे विमान पहाटे निघणार होते. पण, ते साडेचार तास उशिराने निघाले. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले.
काही प्रवाशांच्या महत्वाच्या बैठका होत्या. तर, काहींना कार्यालयास पोहचण्यास उशीर झाल्याचे प्रवाशांनी सोशल मीडियावर टाकले. तर, पुण्यातून सकाळी पुणे-बंगळुरू उड्डाण करणार होते. पण, त्याला देखील पाच तासांपेक्षा जास्त उशीर झाला. प्रवाशांना विमानाला उशीर का होत आहे हे सांगितले जात नव्हते. त्यामुळे प्रवाशांनी विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे जाब विचारण्यास सुरूवात केली.
शेवटी पाच तासानंतर हे विमान बंगळुरूसाठी सुटले. पण, विमान उशीरा सुटल्यामुळे प्रवाशांना विमानतळावर बराच वेळ ताटकळत थांबावे लागले.





