Mumbai News : मुंबई एअपोर्टवर पहाटे ड्रोनच्या घिरट्या, घटनेने परिसरात खळबळ; पोलिसांकडून शोध सुरू

मुंबई : भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकला अॅापरेशन सिंदूर अंतर्गत चोख प्रत्युत्तर देत हवाई हल्ले केले आहेत. यामुळे पाकिस्तानची अशरक्ष: दाणादाण उडाली आहे. भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर खरदारीचा उपाय म्हणून भारतात सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी देखील सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. असं असताना आता मु्ंबईच्या साकिनाका परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली. साकीनाका परिसरातील हजरत तय्यद जलाल (बैगन शाहा दर्गा) मशिदीच्यावर ड्रोन फिरत आहे.
दरम्यान, काही वेळाने हा ड्रोन झोपडपट्टी भागात नाहीसा झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले असून, ड्रोन उडवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने घेतला मोठा निर्णय
भारत-पाकिस्तानात सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. याचाच भाग म्हणून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव येत्या रविवारपासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.





