Landewadi Chowk: लांडेवाडी चौकात वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त
Landewadi Chowk: काही मिनिटांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी बराच वेळ

पिंपरी – भोसरीतील लांडेवाडी चौकात सायंकाळी सहाच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची गर्दी आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. या कोंडीमुळे वाहनचालकांना बराच वेळ रस्त्यावर अडकून राहावे लागत आहे.
चौकातून पुढे जाण्यासाठी बसचालक आणि टुरिस्ट वाहनचालकांची घाई सुरू असते, आपलीच गाडी आधी पुढे गेली पाहिजे, या प्रयत्नात मोठी वाहने रस्ता अडवतात. त्यात रिक्षाचालक आणि दुचाकीस्वारही मिळेल त्या जागेतून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे चौकातील वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा होतो. एकमेकांना पुढे जाऊ न दिल्याने वाहनांच्या रांगा वाढत जातात.
सायंकाळच्या गर्दीच्या वेळी या चौकातून मार्ग काढताना वाहनचालकांची कसरत होते. पुढे जाण्याच्या घाईत अनेकदा वाहनचालकांमध्ये वादावादी आणि भांडणेही होतात. काही मिनिटांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने नोकरदार, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
Wai: वाईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात





