“भारतासाठी हा Wakeup call” ; ट्रम्पचा उल्लेख करत आरबीआयच्या माजी गव्हर्नरचे मोठे विधान

Dr.Raghuram Rajan। भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ डॉ. रघुराम राजन यांनी अमेरिकेने भारतीय निर्यातीवर लादलेले टॅरिफ अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी भारताने कोणत्याही एका व्यापारी भागीदार देशावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हे एक धोक्याचे संकेत असल्याचे म्हटले आहे.
बुधवारपासून लागू झालेल्या ५० टक्के शुल्काबद्दल बोलताना रघुराम राजन यांनी, “ज्यामध्ये रशियाच्या तेलाच्या भारताच्या खरेदीवर अतिरिक्त २५ टक्के दंड देखील समाविष्ट आहे,असे म्हटले. तसेच डॉ. राजन यांनी इशारा देत,”आजच्या जागतिक व्यवस्थेत, व्यवसाय, गुंतवणूक आणि वित्त यांचे शस्त्रीकरण वाढत आहे, म्हणून भारताने काळजीपूर्वक पावले उचलली पाहिजेत” असा सल्ला देखील त्यांनी सरकारला दिला आहे.
भारतासाठी एक इशारा म्हणून शुल्क घेतले Dr.Raghuram Rajan।
एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी, “हा एक इशारा आहे की आपण कोणत्याही एका देशावर जास्त अवलंबून राहू नये याठीचा. आपण आता पूर्व, युरोप आणि आफ्रिकेकडे पाहिले पाहिजे आणि अमेरिकेसोबत पुढे गेले पाहिजे,त्यासोबतच आपल्या तरुणांना रोजगार देण्यासाठी आवश्यक असलेल्या ८-८.५ टक्के विकास दर साध्य करण्यास मदत करणाऱ्या सुधारणा अंमलात आणल्या पाहिजेत.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प प्रशासनाने भारतावर हे कठोर शुल्क लादले आहे, तर रशियाचे सर्वात मोठे आयातदार चीन आणि युरोप आहेत, जे मॉस्कोमधून मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्पादने खरेदी करत आहेत. त्यांच्याविरुद्ध अशी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
‘रशियाच्या तेल आयातीवर पुनर्विचारराची गरज ‘ Dr.Raghuram Rajan।
राजन यांनी सुचवले की भारताने रशियन तेल आयातीवरील आपल्या धोरणाचे पुनर्मूल्यांकन करावे. याविषयी त्यांनी, “आपल्याला विचारावे लागेल की कोणाला फायदा होत आहे आणि कोणाला तोटा होत आहे. रिफायनर्स प्रचंड नफा कमवत आहेत, परंतु निर्यातदार त्याची किंमत टॅरिफद्वारे चुकवत आहेत. जर नफा खूप जास्त नसेल तर कदाचित आपण ही खरेदी सुरू ठेवावी की नाही याचा विचार करणे योग्य आहे.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागाराच्या आरोपांवर काय बोलले ?
व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी रशियाच्या तेलाद्वारे भारत नफा कमवत आहे या आरोपांवर राजन म्हणाले की असे दिसते की एखाद्या वेळी राष्ट्रपतींनी (ट्रम्प) निर्णय घेतला होता की भारत हा एक असा देश आहे जो त्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करत नाही आणि त्याला वेगळे केले पाहिजे. नवारो परवानगीशिवाय फायनान्शियल टाईम्समध्ये लिहिणार नाहीत.
ट्रम्प यांचे दीर्घकालीन सहकारी असलेले नवारो यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की भारतीय रिफायनर्स युक्रेन युद्धाला चालना देत रशियन तेल खरेदी करून पैसे कमवत आहेत. त्यांनी असा युक्तिवाद केला की त्यांना तेलाची गरज नाही. ही एक रिफायनिंग नफेखोरीची योजना आहे.





