“अमेरिका अन् भारताला एकत्र आणण्यासाठी ते नेहमीच..” ; अमेरिकेकडून डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

Dr.Manmohan Singh-America । भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काल रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून शोक व्यक्त करण्यात येत आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल अमेरिकेनेदेखील शोक व्यक्त केला आहे. त्यांनी भारतातील लोकांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
भारत-अमेरिकेच्या संबंधाचा पाया त्यांनी रचला Dr.Manmohan Singh-America ।
अमेरिकेने “डॉ. सिंग हे अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारीतील सर्वात मोठे समर्थक होते. गेल्या दोन दशकांत भारत-अमेरिकेने जे काही साध्य केले त्याचा पाया मनमोहन सिंग यांनी घातला.” असे म्हटले आहे. तसेच डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारताने अमेरिकेसोबतचा अणु सहकार्य करार पुढे नेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा करार केवळ भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच महत्त्वाचा नव्हता, तर दोन्ही देशांमधील सामरिक आणि आर्थिक संबंधांना नव्या उंचीवर घेऊन गेला.” असे म्हणत अमेरिकेकडून त्यांच्या निधावर शोक व्यक्त करण्यात आला आहे.
अमेरिकन प्रशासनाने आपल्या निवेदनात पुढे, “डॉ. सिंग यांना त्यांच्या आर्थिक सुधारणांसाठी स्मरणात ठेवले जाईल, ज्याने भारताच्या आर्थिक विकासाला गती दिली. डॉ. सिंग यांच्या निधनाबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो आणि अमेरिका आणि भारत यांना जवळ आणण्याचे त्यांचे समर्पण नेहमीच लक्षात ठेवू.” असे म्हणत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अमेरिकेसोबत नागरी अणु करार Dr.Manmohan Singh-America ।
2008 मध्ये अमेरिकेसोबत झालेल्या नागरी अणु करारात मनमोहन सिंग यांचे मोठे योगदान होते. या करारामुळे भारताचे अमेरिकेसोबतचे एकूण संबंध बदलले. यामुळे उच्च तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात विशेषत: अणुऊर्जा संशोधन क्षेत्रात भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याचा मार्ग खुला झाला. त्याआधी, मनमोहन सिंग यांनी जुलै 2005 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर भारत आणि अमेरिकेने नागरी अणुऊर्जेच्या क्षेत्रात सहकार्य करण्याची घोषणा केली होती.
19 जुलै रोजी यूएस काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना, मनमोहन सिंग यांनी नागरी अणुऊर्जा क्षेत्रातील भारत-अमेरिका सहकार्याची गरज तपशीलवारपणे अधोरेखित केली आणि अण्वस्त्र अप्रसारात भारताच्या निर्दोष विक्रमाबद्दलही बोलले.





