DPL 2025 : प्रियांश आर्यचे ऐतिहासिक शतक, DPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

DPL 2025 Priyansh Arya Multiple Hundreds Record : दिल्ली प्रीमियर लीग (डीपीएल) 2025 च्या 12 व्या सामन्यात आउटर दिल्ली वॉरियर्सचा युवा फलंदाज प्रियांश आर्य याने 56 चेंडूत 7 चौकार आणि 9 षटकारांसह 111 धावांची शानदार खेळी करत डीपीएलमध्ये अनेक शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. ईस्ट दिल्ली रायडर्सविरुद्ध सलामीला फलंदाजी करताना त्याने 52 चेंडूत शतक पूर्ण केले. मात्र, त्याच्या या खेळीवर ईस्ट दिल्ली रायडर्सने पाणी फेरले. त्यांनी4 चेंडू राखून 231 धावांचा पाठलाग करत डीपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला.
प्रियांश आर्यची शतकी खेळी, पण संघाला पराभव**
साउथ दिल्ली सुपरस्टार्सपासून वेगळे झाल्यानंतर प्रियांशने नव्या संघासाठी सुरुवातीच्या सामन्यांमध्ये 26, 16 आणि 8 धावा केल्या. पण ईस्ट दिल्लीविरुद्ध त्याने शानदार पुनरागमन करत शतक झळकावले. आउटर दिल्लीची सुरुवात खराब झाली, सनत सांगवान लवकर बाद झाला. त्यानंतर प्रियांशने करण गर्गसोबत 46 चेंडूत 92 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. 17 व्या षटकात त्याने शतक पूर्ण केले. त्याच्या खेळीच्या जोरावर आउटर दिल्लीने 20 षटकात 7 बाद 231 धावा उभारल्या. पण ईस्ट दिल्लीने हा डोंगराएवढा लक्ष्याचा पाठलाग करत सामना जिंकला.
अर्पित राणा आणि अनुज रावतचा झंजावात –
Priyansh Arya Smacks his 1st DPL Hundred 🔥💯
Continues his Red Hot IPL Form 👌🔥
.
. #priyansharya #dpl #hundred #century #dpl2025 #explorepage #explorecricket #CricketNews #Cricketupdates #CricketGyan pic.twitter.com/iISZx2MxEJ— Cricket Gyan (@cricketgyann) August 8, 2025
ईस्ट दिल्लीची सुरुवातही खराब झाली आणि संघ 51 धावांत 3 बाद झाला. पण अर्पित राणा आणि कर्णधार अनुज रावत यांनी चौथ्या गडीसाठी 130 धावांची शानदार भागीदारी करत सामन्याचा रंग पालटला. अर्पित राणाने 45 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह 79 धावा केल्या, तर अनुज रावतने 35 चेंडूत 2 चौकार आणि 9 षटकारांसह 84 धावांची तुफानी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
हेही वाचा – Suryakumar Yadav : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! कर्णधार सूर्याने आशिया कपसाठी सुरु केली तयारी, पाहा VIDEO
2024 मधील प्रियांश आर्यचा दमदार फॉर्म कायम –
2024 च्या घरेलू क्रिकेट हंगामात प्रियांशने 67.56 च्या सरासरीने आणि जवळपास 200 च्या स्फोटक स्ट्राइक रेटने 608 धावा काढल्या. या दमदार कामगिरीमुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधले आणि 2025 च्या आयपीएल मेगा लिलावात पंजाब किंग्सने त्याला संघात सामील केले. आयपीएल 2025 मधील पदार्पणाच्या हंगामात त्याने 17 डावांत 179.25 च्या स्ट्राइक रेटने 475 धावा काढल्या. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 103 धावांची शतकी खेळी आणि करिअरमधील सर्वोत्तम 141 धावांची स्फोटक खेळी खेळत त्याने पंजाब किंग्सला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली.





