Suryakumar Yadav : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! कर्णधार सूर्याने आशिया कपसाठी सुरु केली तयारी, पाहा VIDEO

यासोबतच तो व्यायाम करताना आणि धावतानाही दिसला, ज्यामुळे तो पूर्णपणे फिट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले. सूर्यकुमारने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “मला आवडणारे काम पुन्हा करण्यासाठी मी उत्सुक आहे.” गेल्या आठवड्यापासून त्याने नेट्समध्ये फलंदाजीचा सराव सुरू केला असून, ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी तो पूर्ण फिट होण्याच्या मार्गावर आहे.
आशिया कप आणि सूर्यकुमारचे नेतृत्व –
View this post on Instagram
आशिया कपपूर्वी सूर्यकुमारची ही प्रगती भारतीय संघासाठी आणि चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याच्या फिटनेस आणि नेतृत्वावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आशिया कप ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत टी-२० स्वरूपात खेळवला जाणार आहे. रोहित शर्माने २०२४ टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर या स्वरूपातून निवृत्ती घेतल्यानंतर सूर्यकुमारने भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व स्वीकारले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २२ सामन्यांपैकी १७ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
हेही वाचा – Devon Conway : डेव्हॉन कॉनवेचा दोन वर्षानंतर शतकी धमाका! झिम्बाब्वेत केले दोन खास पराक्रम
सूर्यकुमार यादवची कामगिरी –
सूर्याने ८३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सूर्यकुमारने ३८.२ च्या सरासरीने आणि १६७.०७ च्या प्रभावी स्ट्राइक रेटने २,५९८ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी ७१७ धावांसह शानदार कामगिरी केली. त्याच्या या खेळीमुळे मुंबई इंडियन्सने दुसरा क्वालिफायर खेळला. सूर्यकुमार आयपीएलमधील सर्वात मौल्यवान खेळाडू ठरला आणि गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शन (७५९ धावा) याच्यापासून केवळ काही धावांनी मागे राहून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला.





