फेसबुक अकाऊंटवरील’ ‘डिपी’ने विधानसभा निवडणुकीतील पोलखोल?

नेवासा – अमोल नेवासा या फेसबुक अकाऊंटवरुन नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीची पोलखोल या फेसबुक खात्यावरुन केली आहे. यात “मी गडाख साहेब कट्टर होतो आणि कट्टर आहे” असा डिपी लावण्यात आला आहे. अमोल नेवासा या फेसबुकवर असलेल्या मथळ्याची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली आहे. मजकुरामध्ये नेमके काय खरे आणि काय खोटे? याचा नेवासकर या पेजला भेट देऊन विचार करत आहेत.
मात्र या फेसबुक पेजमधून बदनामी झालेल्या काही मान्यवरांनी नेवासा पोलीस ठाण्यात अमोल नेवासा या युजर आयडीचा वापर करुन त्यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. दि.१० डिसेंबर २०२४ रोजी सुनिल गर्जे, महेश मापारी, अल्पेश बोरकर यांच्या फिर्यादीवरुन एका अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीसांकडूनही याबाबत संबंधित फेसबुक युजर आयडीचा मागोवा घेवून तांत्रिक व सायबर विश्लेषकांच्या मदतीने अकाऊंट चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. आरोपीच्या अकाऊंटवरील पोस्टस टिप्पण्या व वैयक्तीक बदनामीचे स्क्रिनशॉट आणि अन्य पुरावे न्यायालयीन प्रक्रियेसाठी जतन केले जात आहेत.
नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयाची परवानगी घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि कल्पना चव्हाण या करत आहेत. त्यामुळे पोलीसांनी सर्व नागरीकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतांना संयम व जबाबदारीने वर्तन करावे, कोणत्याही प्रकारची सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी किंवा बदनामी करण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर केल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले आहे.
दरम्यान, “‘मी गडाख साहेब कट्टर होतो आणि कट्टर आहे” अशी डिपी फेसबुकला लावून अमोल नेवासा या फेसबुक खात्यावरुन अनेकांच्या कारनाम्याचा चांगलाच खरपुस समाचार घेतलेला आहे. परंतु वास्तवात यामध्ये नेमकी सत्यता काय? असा सवाल उपस्थित होत आहे.





