Happy Dussehra wishes 2025: सोशल मीडियावर दसऱ्याच्या शुभेच्छांचा वर्षाव

Happy Dussehra wishes 2025: आज देशभरात दसरा अर्थात विजयादशमी हा सण पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शस्त्रपूजा, रावणदहन आणि आपट्याची पाने देवाणघेवाण करून लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत.
या सोबतच सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांवरून हजारो शुभेच्छा संदेशांची देवाणघेवाण होत आहे. लोक सुंदर शुभेच्छा संदेश, कविता, विचार, फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सणाचा आनंद व्यक्त करत आहेत.
राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांमुळे सोशल मीडियावर उत्सवी वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे.
विजयादशमी हा चांगल्याचा वाईटावर झालेल्या विजयाचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे आज अनेकजण नव्या कामाची सुरुवात करत असून सोशल मीडियावरील शुभेच्छांमुळे परस्परांतील जिव्हाळाही अधिक दृढ होत आहे.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या दहा खास शुभेच्छा संदेश :
1. चांगल्याचा वाईटावर विजय होवो, तुमच्या आयुष्यात सदैव आनंद नांदो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
2. आपट्याच्या पानासारखी सुवर्णमय होवो तुमची जीवनयात्रा. विजयादशमीच्या शुभेच्छा!
3. नव्या कामाची, नव्या सुरुवातीची वेळ आहे ही… तुमच्या प्रत्येक पावलाला यश लाभो.
4. सत्कर्माचा मार्ग स्वीकारा, दुष्ट प्रवृत्तीवर विजय मिळवा.
5. संपत्ती, समृद्धी आणि समाधान तुमच्या घरात सदैव नांदो.
6. आपट्याची पाने देवून जशी माया वाटली जाते, तशीच ममता आणि सौहार्द नात्यांत वाढो.
7. दसऱ्याचा हा शुभदिन तुमच्या जीवनात नव्या आशा, नव्या संधी घेऊन येवो.
8. सुवर्णमयी भवितव्य लाभो, यशाची फुले उमलोत.
9. सुख, समाधान, शांती आणि समृद्धीचे किरण तुमच्या जीवनात दररोज उजळोत.
10. सत्प्रवृत्तीचे रक्षण करा, दुष्ट प्रवृत्तीवर विजय मिळवा – हाच दसऱ्याचा संदेश.
पारंपरिक पद्धती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा हा उत्सव अधिकच रंगतदार झाला असून, दसऱ्याच्या निमित्ताने सकारात्मकता व आनंदाचा संदेश सर्वदूर पोहोचताना दिसत आहे.





