कॅामेडीचा डोस डबल! अजय देवगणच्या ‘दे दे प्यार दे 2’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

‘De De Pyaar De’ 2 Movie Trailer : २०१९ मध्ये दे दे प्यार दे हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमाला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. आता चार वर्षानंतर या सिनेमाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता कॅामेडीचा डोस डबल होणार आहे. आजच दे दे प्यार दे २ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, ट्रेलर प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांचे हसून हसून पोट दुखेल अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे.
या सिनेमात अभिनेता अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग पुन्हा एकदा एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करणार आहेत. मागील सिनेमात, रकुल प्रीत सिंग अजय देवगणच्या घरात जाते. यावेळी मात्र अजय देवगण रकुल प्रीत सिंहच्या कुटुंबीयांकडे राहायला येतो. या भागात आर माधवनची एन्ट्री झाली असून, तो रकुल प्रीत सिंहच्या वडिलांच्या भूमिका साकारतान दिसणार आहे. अजय देवगण आणि रकुल हे सिनेमाच्या कथेत एकमेकांच्या प्रेमात आहेत. पण अनेक अडचणी समोर उभ्या ठाकलेल्या आहेत, या अडचणींचा सामना ते कसे करणार? यासाठी १४ नोव्हेंबरची वाट पाहावी लागेल.
गेल्या काही दिवसांपूर्वी अजय देवगणचा सन अॅाफ सरदार हा सिनेमा बॅाक्स अॅाफिसवर सपशेल फेल ठरला. या सिनेमातील कॅामेडीमुळे अजय देवगणवर टीका करण्यात आली होती. त्या टीकेला उत्तर म्हणून दे दे प्यार दे २ सिनेमा असल्याचे दिसत आहे.
ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या कॅामेडीने प्रेक्षकांना हसू येते, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मीजान जाफरी यांनी केले आहे. १४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता या सिनेमाला कसा प्रतिसाद प्रेक्षक देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा : बिहार निवडणुकीसाठी जेडीयूची ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; वाचा संपूर्ण यादी





