पुणे जिल्हा | बारामतीत करवाढ करू नका – सुप्रिया सुळे

बारामती, (प्रतिनिधी)- नगरपालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी व मालमत्ता करात वाढ करू नये, अशी बारामतीकरांची मागणी आहे, याबाबत नगरपालिका प्रशासनाने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष अॅड. संदीप गुजर व युवकाध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांना याबाबत निवेदन दिले आहे. सुप्रिया सुळे यांनी या निवेदनात नमूद केले आहे की, बारामती शहर आणि परिसरात यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे.
यामुळे नागरिक मोठ्या विवंचनेत आहेत. त्यातच बारामती नगरपरिषदेकडू घरपट्टी, पाणीपट्टी व मालमत्ता करांत वाढ होणेबाबत सूचित करण्यात आले आहे. मागील काही काळातील दुष्काळ व कोविड महामारीमुळे अगोदर अडचणीत असणाऱ्या नागरिकांची चिंत यामुळे वाढत आहे.
बारामती नगरपरिषद हद्दीतील मिळकतधारकांना आकारण्यात आलेल कर आकारणी जास्त पटीने आकारलेल आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. नगरपरिषदेकडून घरपट्टी, पाणीपट्ट व मालमत्ता आदी करांत वाढ करण्यान येऊ नये, अशी मागणी होत आहे.





