“वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करू नका, कारण…”; विजय वडेट्टीवारांनी सांगितली आतली बातमी

Vijay Wadettiwar on Santosh Deshmukh Case | बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाशी निगडीत असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराडचा शोध घेतला जात होता.
अखेर तो 22 दिवसानंतर पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला. यातच आता संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचा तपास आता एसआयटी करणार आहे. यादरम्यान विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराडचा एनकाउंटर केला जाऊ शकतो, असा खळबळजनक दावा केला आहे.
विजय वडेट्टीवार नेमक काय म्हणाले?
विजय वडेट्टीवार म्हणाले की, “मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काऊंटरही केला जाऊ शकतो. त्यामुळे या छोट्या आकाला वाचवा. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काऊंटर करू नका. मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्यासाठी असे होऊ शकते, अशी माहिती मला विश्वसनीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे. यावरून काहीही होऊ शकते,” असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
#LIVE : माध्यम प्रतिनिधींशी संवाद,नागपूर https://t.co/1t0DTdkCD8
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 2, 2025
…तर पोलीस विभागाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही
पुढे ते म्हणाले की, “बीडमधील यापूर्वीचा इतिहास असा आहे की, कराडलाच बाप मानून त्या ठिकाणी पोलीस वागत होते. 22 दिवस पोलीस त्याला पकडू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे. गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे. त्यांना कदाचित ही माहिती नसेल. पण जनतेत चर्चा आहे. त्याकडे लक्ष दिले नाही तर पोलीस विभागाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
एसआयटीचे पथक आज बीडमध्ये
एसआयटीचे पथक आज बीडमध्ये दाखल होणार आहे. याबाबत वडेट्टीवार यांनी सीआयडीचा तपास सुरू होता. एसआयटी तपास भरकटवण्यासाठी तर केली नाही ना? आता एसआयटी आणली. सीआयडीने वाईट काम केले म्हणून यांना नेमले का? असा सवाल उपस्थित केला आहे. Vijay Wadettiwar on Santosh Deshmukh Case |
बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग
तर बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आले आहे. त्यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली. काल पोलीस स्टेशनमध्ये बेड आणले. हे बेड पोलिसांसाठी असल्याचे सांगितले. पण पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशनमध्ये बेडवर झोपल्याची माहिती नाही. मग हे कोणाचे लाड आहेत? वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी, त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते आणले गेले. याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. Vijay Wadettiwar on Santosh Deshmukh Case |
हेही वाचा :
Rajgurunagar Case : ‘राजगुरुनगर’ अत्याचार प्रकरण ; आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी





