Donald Trump: “जगाच्या भल्यासाठी हल्ला रद्द करतोय” ; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, करारात होर्मुझबाबत काय निर्णय झाला?
Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून इराणवर हल्ला करण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले आहे.

Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून इराणवर हल्ला करण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले आहे. त्यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून म्हटले आहे की, अमेरिका इराणविरुद्ध कारवाई करण्यास पूर्णपणे तयार आहे. त्यांनी म्हटले की, आपल्या लष्करी सामर्थ्याची आणि क्षमतेची पातळी दुसऱ्या महायुद्धानंतर कधीही न पाहिलेल्या स्तरावर आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराण आणि इतर मध्य-पूर्वेकडील देशांनी त्यांना कोणताही हल्ला थांबवण्यास सांगितले आहे, कारण एका आराखडा करारावर सहमती झाली आहे. या करारामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ आणि पूर्णपणे खुली करणे आणि इराणचा आण्विक धोका नाहीसा करणे यांचा समावेश असेल.
ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, हे आवाहन ऐकून, जगाच्या भविष्यातील फायद्यासाठी आणि यशस्वी व समृद्ध इराणच्या अस्तित्वासाठी हल्ला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र अट ही आहे की लवकरच एक करार झाला पाहिजे. या वचनबद्धतेमध्ये इस्रायलदेखील त्यांच्यासोबत आहे. “सर्वांनी कामाला लागून हे घडवून आणले पाहिजे.” असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
“The U.S.A. is locked and loaded and ready to go against the Islamic Republic of Iran, at levels of Military Terror, Strength, and Power not seen since World War II. Despite this, we have just been asked by Iran, and other Middle Eastern Countries, to hold off any attack in that… pic.twitter.com/Ylmlm06j3E
— The White House (@WhiteHouse) August 2, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची प्रतिक्रिया Donald Trump:
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हल्ल्यांची धमकी दिल्यावर प्रतिक्रिया देताना, इराणने म्हटले आहे की, “जर अमेरिका किंवा इस्रायलने त्यांच्या भूभागाला लक्ष्य केले, तर हे युद्ध लष्करी तळांवरील हल्ल्यांच्या पलीकडे जाईल”. इराणने पश्चिम आशियातील महत्त्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करून प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे.
अमेरिकेच्या ऊर्जा तळांवर हल्ला करण्याची धमकी Donald Trump:
तेहरानच्या सरकारी तस्निम वृत्तसंस्थेने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, इराणने आपल्या पायाभूत सुविधांवर संभाव्य अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांचे वृत्त ‘वेडगळपणा’ म्हणून फेटाळून लावले आहे.
त्या अधिकाऱ्याने सांगितले की, “तेहरानने एक मोठी प्रत्युत्तरात्मक योजना तयार केली आहे”. त्यांनी पुढे सांगितले की, “कोणत्याही हल्ल्याला इस्रायलच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर आणि या प्रदेशातील अमेरिकेच्या ऊर्जा तळांवर हल्ले करून प्रत्युत्तर दिले जाईल.”





