Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी केले भारतीय निवडणूक प्रणालीचे कौतुक !
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अमेरिकेतील निवडणुकांमध्ये मतदार ओळखपत्राच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची आठवण देखील त्यांनी करून दिली.

Donald Trump – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक प्रणालीचे कौतुक केले आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अमेरिकेतील निवडणुकांमध्ये मतदार ओळखपत्राच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची आठवण देखील त्यांनी करून दिली.
भारतातील नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ६४.६ कोटींहून अधिक लोकांनी भाग घेतला, तरीही एक टक्क्याहून कमी लोकांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले याचा उल्लेख सोमवारी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी केला.
सेव्ह अमेरिका कायद्याच्या समर्थनार्थ ट्रम्प यांनी अमेरिकेत देखील मतदारांकडे नोंदणीकृत मतदार म्हणून पुरावा असणे गरजेचे आहे. तसेच देशव्यापी मतदार ओळखपत्राची अट लागू करणे आणि टपाल मतदानावर कठोर निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
भारत आणि ब्राझीलने मतदार ओळखपत्रे आधीच बायोमेट्रिक डेटाबेसशी जोडली आहेत, तर अमेरिका मतदारांच्या स्वयं-घोषणापत्रावर अवलंबून आहे. त्याच प्रमाणे निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा गालण्यासाठी सेफगार्ड अमेरिकन व्होटर एलिजिबिलिटी अर्थात सेव्ह अमेरिका ॲक्ट मंजूर करण्याचा आग्रह ट्रम्प धरत आहेत.





