“…तर मी पुन्हा तुमच्यावरचा टॅरिफ वाढवू शकतो ” ; डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला थेट धमकी

Donald Trump on INDIA। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलावरील कारवाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान, त्यांनी भारताबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ट्रम्प यांनी भारताला इशारा देत, देशावरील टॅरिफ आणखी वाढवता येऊ शकते असे म्हटले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचाही उल्लेख केला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी ही धमकी दिली आहे. भारतावर शुल्क लादण्याबाबत बोलताना ट्रम्प यांनी, “त्यांना खरोखरच या मुद्द्यावर माझे समाधान करायचे होते. पंतप्रधान मोदी खूप चांगले चांगले व्यक्ती आहेत. त्यांना माहित होतं की भारतानं रशियन तेल खरेदी केल्याने मी खूश नाही. मला समाधानी करणं महत्वाचं होतं. जर त्यांनी रशियन तेल खरेदी करणे सुरू ठेवले तर आपण त्यांच्यावर लवकरच शुल्क वाढवू शकतो.”असा इशाराच त्यांनी दिलाय.
#WATCH | On India’s Russian oil imports, US President Donald J Trump says, “… They wanted to make me happy, basically… PM Modi’s a very good man. He’s a good guy. He knew I was not happy. It was important to make me happy. They do trade, and we can raise tariffs on them very… pic.twitter.com/ANNdO36CZI
— ANI (@ANI) January 5, 2026
ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ का लादले? Donald Trump on INDIA।
डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये भारतावर ५० टक्के कर लादला. ते रशियासोबतच्या भारताच्या तेल व्यापारावर नाराज होते आणि त्यांनी हे अनेक वेळा नमूद केले. ट्रम्पच्या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील व्यापार करार बराच काळ रखडला होता. ट्रम्प यांना भारताने अमेरिकेसाठी संपूर्ण बाजारपेठ खुली करावी आणि दुग्धजन्य पदार्थ आणि कृषी क्षेत्रात प्रवेश करावा अशी इच्छा होती, परंतु भारत आपल्या निर्णयावर ठाम होता.
ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत Donald Trump on INDIA।
भारत आणि रशियाचे वर्षानुवर्षे चांगले संबंध आहेत आणि दोन्ही देशांमध्ये व्यापार देखील होतो. यावर ट्रम्प नाराज आहेत. त्यांच्या नुकत्याच केलेल्या विधानाचाही उल्लेख आहे. व्हेनेझुएलामध्ये केलेल्या कारवाईबाबत ट्रम्प सध्या बातम्यांमध्ये आहेत. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांना अटक केली आहे आणि आता त्यांच्यावर खटला चालवला जात आहे.





