Donald Trump : रशिया-चीनकडून इराणला मदत मिळत नसावी; ट्रम्प यांनी व्यक्त केला विश्वास
अमेरिकेसोबतच्या संघर्षात चीन आणि रशियाकडून इराणला मदत केली जात नसावी यावर आपला विश्वास आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शुक्रवारी सांगितले.

Donald Trump : अमेरिकेसोबतच्या संघर्षात चीन आणि रशियाकडून इराणला मदत केली जात नसावी यावर आपला विश्वास आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शुक्रवारी सांगितले. परंतु जर चीन आणि रशिया या युद्धात सामील झाले तर ते त्यांच्यासाठी खूप वाईट असेल, असा इशाराही त्यांनी दिला.
कोणत्याही परिस्थितीत इराणला शस्त्रे देणार नाहीत किंवा विकणार नाहीत, असे चीनमधील बीजिंग येथे नुकत्याच (Donald Trump) झालेल्या आमच्या भेटीत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्याला सांगितल्याचे ट्रम्प म्हणाले.
जिनपिंग यांच्या या ग्वाहीमध्ये चिनी कंपन्यांचाही समावेश होता, असेही ट्रम्प म्हणाले. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनीही इराणला शस्त्रे विकणार नाही असे आपल्याला सांगितले होते.
रशिया आणि चीन इराण संघर्षात सहभागी नाहीत, असा आपला विश्वास असल्याचेही ट्रम्प (Donald Trump) म्हणाले. रशिया आणि चीन यांचा या युद्धात सहभाग असल्याचे अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला खासदारांना सांगितले होते. परंतू इराण विरुद्धच्या युद्धात या देशांचा सहभाग नेमका कसा आहे, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. त्या पार्श्वभुमीवर ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली आहे.






