Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा ! कॅनडावर 50 टक्के टॅरिफ लादणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी कॅनडातील वाईन, हॉकी स्टिक्स आणि सिमेंट यांसारख्या विशिष्ट वस्तूंवर अतिरिक्त ५०% आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा केली आहे.

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी कॅनडातील वाईन, हॉकी स्टिक्स आणि सिमेंट यांसारख्या विशिष्ट वस्तूंवर अतिरिक्त ५०% आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकन उत्पादनांविरोधात कॅनडाकडून (Donald Trump) केल्या जाणाऱ्या भेदभावपूर्ण धोरणांना प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले. स्वाक्षरी झाल्यानंतर ३० दिवसांनी लागू होणाऱ्या या निर्णयाचा फटका कॅनडाच्या सुमारे २० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला बसणार आहे.
अमेरिकन वाहनांवरील कॅनेडियन धोरणे आणि काही प्रांतांनी अमेरिकन मद्य उत्पादनांवर घातलेली बंदी यामुळे अमेरिकेचे (Donald Trump) नुकसान होत असल्याचा आरोप व्हाईट हाऊसने केला आहे. मात्र, ऊर्जा, पोटॅश, मासे आणि महत्त्वपूर्ण खनिजे यांसारखी क्षेत्रे या शुल्कातून वगळण्यात आली आहेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी या निर्णयावर टीका करत, हा ‘युएसएमसीए’ व्यापार कराराचा भंग असल्याचे म्हटले आहे.
या एकतर्फी व्यापार कारवाईमुळे दोन्ही देशांतील नागरिकांचा, विशेषतः अमेरिकन कुटुंबांचा खर्च वाढेल, असा इशारा त्यांनी दिला. ओंटारियोच्या प्रांतीय नेत्यांनी कॅनडानेही ‘कराच्या बदल्यात कर’ लादून प्रत्युत्तर द्यावे अशी मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, हे शुल्क १९३० च्या व्यापार कायद्यातील ‘कलम ३३८’ अन्वये लादले जात असून, या कलमाचा वापर पहिल्यांदाच होत असल्याने याला कायदेशीर आव्हान मिळण्याची शक्यता आहे. कॅनडातील वणव्यांमुळे अमेरिकेत पसरलेल्या विषारी धुराच्या भरपाईचा (Donald Trump) मुद्दाही ट्रम्प यांनी या टॅरिफच्या संदर्भात उपस्थित केला आहे.






