Lionel Messi : मेस्सी समोरच ट्रम्प यांनी गायले रोनाल्डोचे गुणगाण! व्हाइट हाऊसमध्ये चॅम्पियन मियामीचं स्वागत; ‘त्या’ भेटीची सर्वत्र चर्चा
Lionel Messi : या भाषणादरम्यान त्यांनी मेस्सीची तुलना फुटबॉल सम्राट पेले यांच्याशी केली, तर मेस्सीच्या उपस्थितीतच त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोचाही उल्लेख 'ग्रेट' म्हणून केला.

Lionel Messi Visit Donald Trump White House : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२५ एमएलएस कप विजेत्या ‘इंटर मियामी’ संघाचे व्हाईट हाऊसमध्ये यजमानपद भूषवले. यावेळी ट्रम्प यांनी आपल्या खास शैलीत भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी मेस्सीची तुलना फुटबॉल सम्राट पेले यांच्याशी केली, तर मेस्सीच्या उपस्थितीतच त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोचाही उल्लेख ‘ग्रेट’ म्हणून केला.
ट्रम्पकडून व्हाइट हाऊसमध्ये मेस्सीचे स्वागत –
आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “आज २०२५ एमएलएस कप चॅम्पियन इंटर मियामीचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आजपर्यंत कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला जे म्हणण्याची संधी मिळाली नाही, ती मला मिळाली आहे, लिओनेल मेस्सी, तुझे व्हाइट हाऊसमध्ये स्वागत आहे!”
“Welcome to the White House, Messi” — Donald Trump Honors Football Legend#LionelMessi #Trump #WhiteHouse #InterMiami #MLS #FootballNews #Soccer #Messi #WorldCup2026 #USNews pic.twitter.com/blxT718S3G
— Asianet News English (@AsianetNewsEN) March 6, 2026
मी पण मेस्सीलाच श्रेष्ट मानतो – डोनाल्ड ट्रम्प
ट्रम्प पुढे म्हणाले, “मी पेले यांना खेळताना पाहिले आहे. मला माहित नाही, कदाचित तू त्यांच्यापेक्षाही सरस असू शकतोस. पेले खूप चांगले होते.” त्यानंतर ट्रम्प यांनी तिथे उपस्थित खेळाडूंना विचारले, “मेस्सी श्रेष्ठ की पेले?” सर्वांनी एकच गलका करत मेस्सीचे नाव घेतले, त्यावर ट्रम्प यांनीही हसत “मी पण मेस्सीच मानतो” असे उत्तर दिले.
मेस्सीने दिली ‘गुलाबी’ फुटबॉलची भेट –
A PHOTO FOR THE MEMORY BETWEEN MESSI AND TRUMP 🇺🇸🇦🇷
Both posed at the White House holding up the jersey of the MLS champions during Inter Miami’s visit. 🦩📸#LionelMessi #DonaldTrump #InterMiami #MLS #Football pic.twitter.com/RYgosZKXov
— MARCA in English 🇺🇸 (@MARCAinENGLISH) March 5, 2026
या कार्यक्रमात इंटर मियामी संघाने डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या संघाची जर्सी भेट दिली. मात्र, सर्वांचे लक्ष वेधले ते लिओनेल मेस्सीने दिलेल्या भेटीने. मेस्सीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना एक ‘रत्नजडित गुलाबी फुटबॉल’ (Jewel-encrusted pink football) भेट म्हणून दिला. मेस्सीने यावेळी कोणतेही भाषण केले नाही, मात्र ट्रम्प यांच्या प्रत्येक विधानावर तो स्मितहास्य करत दाद देत होता.
मियामीची निवड केल्याबद्दल मानले आभार –
#6Mar @realDonaldTrump invitó ayer al astro del fútbol #LionelMessi y el plantel del Inter a conocer el Salón Oval de @WhiteHouse pic.twitter.com/Y7zRHvxg59
— CATERINA VALENTINO (@CATERINAV) March 6, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांनी मेस्सीचे आभार मानताना म्हटले की, “तू जगातील कोणत्याही देशात, कोणत्याही संघात जाऊ शकला असतास, पण तू मियामीची निवड केलीस. त्याबद्दल मी तुझे आभार मानतो.” मेस्सीने अमेरिकेत येऊन फुटबॉलला एका वेगळ्या उंचीवर नेल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले.





