IND vs NZ : भारत-न्यूझीलंड फायनल सामना रद्द झाल्यास, कोणाला विजेता घोषित केलं जाणार? जाणून घ्या ICCचा नियम
IND vs NZ : जर पावसाचा किंवा इतर कोणत्या कारणाने या महामुकाबल्यात व्यत्यय आला, तर नेमके काय होईल? चषकावर कोणाचं नाव कोरलं जाणार? जाणून घ्या

IND vs NZ T20 World Cup 2026 Final Rain Rules : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. दोन्ही संघ फॉर्मात असून क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, जर पावसाचा किंवा इतर कोणत्या कारणाने या महामुकाबल्यात व्यत्यय आला, तर नेमके काय होईल? चषकावर कोणाचे नाव कोरले जाईल? या प्रश्नांची उत्तरे आयसीसीच्या नियमावलीत दडलेली आहेत, त्याबाबत जाणून घेऊया.
जर सामना रद्द झाला तर विजेता कोण ठरेल?
हा अंतिम सामना आहे आणि आयसीसी सामना खेळवूनच निकाल लावण्याचा प्रयत्न करेल. परिणामी, आयसीसीने या सामन्यासाठी राखीव दिवस निश्चित केला आहे. जर सामना नियोजिच वेळेत त्या दिवशी पावसामुळे सुरू झाला नाही किंवा अपूर्ण राहिला तर सामना दुसऱ्या दिवशी (९ मार्च) राखीव दिवशी खेळवला जाईल. जर सामना ८ मार्च रोजी सुरू झाला असेल परंतु पावसामुळे थांबला असेल तर तो ९ मार्च रोजी त्याच ठिकाणापासून सुरू राहील, म्हणजेच सुरुवातीपासून खेळवला जाणार नाही.
रिझर्व्ह डे (राखीव दिवस) आणि वेळेचा नियम –
- आयसीसीने अंतिम सामन्यासाठी ‘रिझर्व्ह डे’ची (९ मार्च) तरतूद केली आहे.
- जर ८ मार्च रोजी पावसामुळे सामना सुरू होऊ शकला नाही किंवा अपूर्ण राहिला, तर तो ९ मार्चला खेळवला जाईल.
- ८ मार्चला सामना जिथे थांबला होता, तिथूनच पुढचा खेळ रिझर्व्ह डे ला सुरू होईल.
- निकालासाठी दोन्ही संघांनी किमान १०-१० षटके खेळणे अनिवार्य आहे. तसेच, दोन्ही दिवशी १२० मिनिटांचा अतिरिक्त वेळही देण्यात आला आहे.
दोन्ही दिवस खेळ शक्य झाला नाही तर?
Marching towards the #Final 👏
A step away from 𝙂𝙡𝙤𝙧𝙮 🏆#TeamIndia is into the #T20WorldCup finale 🥳Scorecard ▶️ https://t.co/LxSBs3EDPx#MenInBlue | #ENGvIND pic.twitter.com/6BBNkNw2aB
— BCCI (@BCCI) March 5, 2026
जर ८ आणि ९ मार्च या दोन्ही दिवशी पावसाने बॅटिंग केली आणि खेळ अजिबात शक्य झाला नाही, तर आयसीसीच्या नियमांनुसार भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना ‘संयुक्त विजेते’ घोषित केले जाईल. अशी परिस्थिती क्रिकेटच्या इतिहासात क्वचितच पाहायला मिळते. यापूर्वी २००२-०३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले होते.
भारतासमोर इतिहासाची आणि न्यूझीलंडची दुहेरी आव्हाने –
- सलग दुसरे जेतेपद: भारतीय संघ सध्या ‘डिफेंडिंग चॅम्पियन’ आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही संघाने सलग दोनदा जेतेपद पटकावलेले नाही. भारताला हा विक्रम करण्याची संधी आहे.
- न्यूझीलंडचा ‘फोबिया’: धक्कादायक बाब म्हणजे, टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारताने न्यूझीलंडला आजवर कधीही हरवलेले नाही. दुसरीकडे, किवी संघ आपल्या पहिल्या टी-२० विश्वचषक ट्रॉफीसाठी मैदानात उतरेल.





