डोनाल्ड ट्रम्प यांच्या तब्येतीविषयी मोठा खुलासा ; MRI रिपोर्टसंदर्भात व्हाईट हाऊसने दिली ‘ही’ माहिती

Donald Trump Health। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजारपणा संदर्भात एक फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या फोटोवर अखेर व्हाईट हाऊसने मौन सोडत उत्तरं दिली आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा एमआरआय स्कॅन अहवाल आणि त्याचे निकाल जाहीर करण्यात आले असल्याचे संग्न्येत येत आहे. हा एमआरआय ऑक्टोबरमध्ये करण्यात आला होता आणि तो नियमित वैद्यकीय तपासणीचा भाग असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले जाते.
कुठे आणि कोणत्या अवयवाचे स्कॅनिंग केले? Donald Trump Health।
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसंदर्भात माहिती दिली. त्यांनी याविषयी बोलताना, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची ऑक्टोबर २०२५ मध्ये वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरमध्ये नियमित आरोग्य तपासणी करण्यात आली. या काळात, त्यांचे हृदय (हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली) आणि पोट (पोट प्रणाली) तपासण्यासाठी प्रतिबंधात्मक स्कॅन करण्यात आला. एमआरआय स्कॅन केवळ त्यांचे हृदय आणि पोटाच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी करण्यात आला होता. त्यांचा मेंदू तपासण्याचा हेतू नव्हता, कारण त्यांनी आधीच यासंदर्भातल्या चाचण्या उत्तीर्ण केल्या होत्या.
🚨 JUST IN: @POTUS Trump’s MRI results are in – and he’s in excellent health.
“Cardiovascular imaging: perfectly normal.”
“No narrowing, no abnormalities, no inflammation.”
“Abdominal imaging: all major organs healthy and well perfused.”“This was part of a standard executive… pic.twitter.com/fbHq9pZpS8
— LindellTV (@RealLindellTV) December 1, 2025
एमआरआय स्कॅन रिपोर्टमध्ये काय म्हटले?
लेविट यांनी रिपोर्टविषयी व्हाईट हाऊसचे डॉक्टर डॉ. शॉन बार्बेबेला यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा एमआरआय रिपोर्ट आणि त्याचे निकाल असलेले एक मेमो जारी केले आहे. या मेमोमध्ये स्पष्टपणे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा एमआरआय रिपोर्ट पूर्णपणे सामान्य आहे आणि त्यांची तब्येत पूर्णपणे उत्तम आहे असे म्हटले आहे. त्यांच्या हृदयात किंवा नसांमध्ये कोणतीही सूज, अरुंदता किंवा रक्ताच्या गुठळ्या नाहीत. त्यांचे पोट देखील पूर्णपणे निरोगी आहे. त्यांच्या शरीरातील सर्व अवयव पूर्णपणे कार्यरत आहेत आणि पूर्णपणे निरोगी आहेत; त्यांना कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या नाही.
ट्रम्पच्या प्रकृतीबद्दल प्रश्न का उपस्थित केले? Donald Trump Health।
अलीकडेच, अध्यक्ष ट्रम्प यांचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते फ्लोरिडातील मार-ए-लागो क्लबमध्ये खिडकीजवळ बसलेले दिसत होते. त्यांचे डोळे बंद होते आणि तोंड उघडे होते. त्यांनी पांढरा पोलो टी-शर्ट आणि ४५-४७ क्रमांक लिहिलेली टोपी घातली होती. हा फोटो पाहून मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ यांच्यासह अनेक डेमोक्रॅट्सनी त्यांच्या प्रकृतीबद्दल प्रश्न उपस्थित केले.
ट्रम्प यांनी काय म्हटले?
३० नोव्हेंबर २०२५ रोजी जेव्हा हा फोटो व्हायरल झाला आणि माध्यमांपर्यंत पोहोचला तेव्हा फ्लोरिडाहून परतताना एअर फोर्स वनमधील पत्रकारांनी त्यांना त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारले. त्यांनी सांगितले की ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांचा एमआरआय झाला होता, परंतु त्यांना माहित नव्हते की शरीराचा कोणता भाग स्कॅन केला आहे. त्यांनी सांगितले की ते लवकरच त्यांचा आरोग्य अहवाल प्रसिद्ध करतील. त्यानुसार काल व्हाईट हाऊसने माध्यमांना दिलेले वचन पूर्ण केले आहे.





