Donald Trump : रशिया-युक्रेनमध्ये ऊर्जाविषयक युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
शिया आणि युक्रेनमध्ये ऊर्जाषयक युद्धविराम झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र या युद्धविरामाच्या काय अटी आहेत, याचा कोणताही तपशील ट्रम्प (Donald Trump) यांनी दिला नाही.

Donald Trump : रशिया आणि युक्रेनमध्ये ऊर्जाषयक युद्धविराम झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र या युद्धविरामाच्या काय अटी आहेत, याचा कोणताही तपशील ट्रम्प (Donald Trump) यांनी दिला नाही. रशिया-युक्रेनमध्ये युद्धविरामाची तात्काळ अंमलबजावणी होते आहे. याचे उल्लंघन करू नये, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रशियाच्यावतीने ट्रम्प (Donald Trump) यांच्या दाव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही. तसेच व्हाइट हाउसने देखील याबाबतचे कोणतेही स्पष्टिकरण दिलेले नाही. मात्र युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी या घोषणेचे स्वागत केले आहे. ऊर्जाविषयक युद्धविरामाची ही बातमी सर्वांसाठी चांगली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या प्रयत्नातून हा युद्धविराम घडवण्यात आला असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
रशिया आणि युक्रेनकडून एकमेकांच्या तेल आणि गॅस विषयीच्या प्रकल्पांवर सातत्याने हल्ले केले जात असल्यामुळे अभूतपूर्व ऊर्जा टंचाई निर्माण होण्याचा धोका ट्रम्प (Donald Trump) यांनी अलिकडेच वर्तवला होता. यातूनच त्यांनी रशियावरील ऊर्जा निर्यात बंदी हटवून अमेरिका रशियाकडून डीझेल खरेदी करणार असल्याचे जाहीर केले होते.
युद्धबंदी केल्यास ६० दिवसात निवडणुका
जर रशियाने युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारला, तर युक्रेनमध्ये ६० दिवसात अध्यक्षीय निवडणुका घेतल्या जातील, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. रशियाबरोबर युद्धबंदीसाठी तडजोड करू शकणाऱ्या नेत्याची युक्रेनच्या अध्यक्षपदी निवड होणे गरजेचे आहे, असे ट्रम्प यांनी काल म्हटले होते. त्यावर झेलेन्स्की यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर रशिया युद्धबंदी करणार असेल, तर आपण अध्यक्षपदावरून पायउतार होण्यास तयार असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.
युद्धबंदीसाठी आपण रशियाला अनेक प्रस्ताव दिले आहेत. पण रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी कायमच या प्रस्तावांना नकार दिला आहे. आता पुतीन अमेरिकेला काही वेगळे उत्तर देतील, अशी आपल्याला आशा आहे. रशियाशी मध्यस्थी करण्यासाठी आपण कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी, फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब आणि नाटोचे महासचिव मार्क रुटे यांच्याशी चर्चा केल्याचेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.





