Donald Trump : ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धबंदीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न

वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्यायुद्धबंदीचे क्षेय घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. या युद्धबंदीसाठी आपण व्यापाराचा मुद्दा वापरल्याचे ट्रम्प यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. याशिवाय अण्वस्त्रधारी शेजारी देशांमध्ये तणाव असणे धोकादायक असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी देशांमध्ये युद्धबंदी घडण्याच्या मुद्द्याचे श्रेय आपल्याला घ्यायला आवडेल. हे दोन्ही देश एकमेकांवर रागावले होते. तशास तसे धोरणानुसार एकमेकांवर क्षेपणास्त्रे टाकली जात होती. मात्र दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्यामुळे हा संघर्ष धोकादायक बनू शकला असता. हा संघर्ष थांबवण्यासाठीच आपण व्यापार करण्याचा मुद्दा वापरल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
दक्षिण कोरियानेही आपल्या समोर व्यापारी करार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र आपण हा करार करणार नाही. काही वेगळा करार केला जाईल. जवळपास १५० देशांना अमेरिकेशी व्यापारी करार करायचा आहे. पण प्रत्येकाशी हा करार केला जाऊ शकत नाही, असेही ट्रम्प यांनी सांगितले.





