पत्नी ट्विंकल फोन तपासते का ? अक्षय कुमारने दिल ‘उत्तर’

Bollywood News । अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा ‘खेल खेल’ हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लॉन्च दरम्यान, अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रश्नांवर देखील प्रतिक्रिया दिली.
ट्रेलर लाँचच्या वेळी कोणीतरी अक्षयला विचारले की त्याची पत्नी ट्विंकल खन्ना त्याचा फोन चेक करते का? यावर अक्षयने मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला,’माझ्या कुटुंबातील कोणालाही फोनचा पासवर्ड माहित नाही. त्यामुळे फोने चेक करणार नाही.’
याशिवाय अक्षयला विचारण्यात आले की, ‘जर त्याला कोणाचा फोन चेक करण्याची संधी मिळाली तर तो कोणाचा फोन चेक करेल? तर तो म्हणाला की तो दिग्दर्शक मुदस्सर अझीझचा फोन तपासणार आहे कारण तो एक रोमँटिक व्यक्ती आहे. याशिवाय अक्षयने सांगितले की तो त्याच्या व्यवसाय आणि वित्ताशी संबंधित गोष्टी इतरांपासून लपवून ठेवतो.
दरम्यान, हा चित्रपट एक खेळकर विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा जोडप्यांवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज यांनी केले आहे.या चित्रपटात तापसी पन्नू, फरदीन खान, वाणी कपूर, एमी विर्क आणि आदित्य सील यांच्या भूमिका आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अक्षय कुमारकडे सध्या अनेक चित्रपट आहे. अक्षय यावर्षी सुनील शेट्टी, निम्रत कौर आणि सारा अली खानसोबत ‘स्काय फोर्स’मध्ये दिसणार आहे. हा अभिनेता रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्येही दिसणार आहे. याशिवाय तो वेलकम टू द जंगलमध्येही दिसणार आहे.





