Manoj Jarange : मोठी बातमी..! मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचे पाठबळ? बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आर्थिक रसद पुरवल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. प्रसाद लाड हेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागचे ‘मास्टरमाइंड’ असल्याचा दावाही हाके यांनी केला. (Manoj Jarange)
‘प्रसाद लाड यांनीच जरांगेंना पैसा पुरवला’
पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली. ‘मनोज जरांगे यांचे आंदोलन उभे करण्यासाठी प्रसाद लाड यांनीच पैसा पुरवला,’ असा आरोप त्यांनी केला. तसेच जरांगे यांना ‘फीडिंग’ करण्याची सवय लाड यांना लागली असल्याचेही हाके म्हणाले. (Manoj Jarange)
यावेळी हाके यांनी प्रसाद लाड यांच्या ‘क्रिस्टल ग्रुप’चाही उल्लेख केला. कंपनीतील रोजगार, आरक्षण आणि कामगार कायद्यांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या आरोपांबाबत संबंधित कंपनी किंवा प्रसाद लाड यांच्याकडून स्पष्टीकरण आलेले नाही. (Manoj Jarange)
‘मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठीही फूस लावली’
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यांचाही लक्ष्मण हाके यांनी उल्लेख केला. जरांगेंना मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठीही प्रसाद लाड यांनी फूस लावल्याचा आरोप त्यांनी केला. ‘जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आई-बहिणींबद्दल अपशब्द वापरले, तेव्हा प्रसाद लाड कुठे होते?’ असा सवाल हाके यांनी उपस्थित केला. (Manoj Jarange)
ओबीसी समाजही प्रतिआंदोलनाच्या तयारीत
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजही आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. मनोज जरांगे यांच्या ज्या-ज्या ठिकाणी सभा होतील, त्या ठिकाणी ओबीसी एकजुटीसाठी प्रतिसभा घेणार असल्याची घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली. (Manoj Jarange)
‘ओबीसी समाजाला मिळणारे आरक्षण धोक्यात आले आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमधील कोणताही नेता यावर स्पष्टपणे बोलायला तयार नाही,’ अशी नाराजीही हाके यांनी व्यक्त केली. (Manoj Jarange)
‘जरांगेंच्या भाषेमुळे अशांतता निर्माण होतेय’
मनोज जरांगे यांच्या भाषाशैलीवरही लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली. जरांगे ग्रामीण भागात गेल्यानंतर विविध राजकीय नेत्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. (Manoj Jarange)
छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि नारायण राणे यांच्यावरूनही हाके यांनी जरांगेंवर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेत असताना राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. (Manoj Jarange)
दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील या आरोपांवर काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Manoj Jarange)
Manoj Jarange : देवाला साकडे घालून सरकार सुधारणार नाही; जनताच वठणीवर आणेल; मनोज जरांगेचा घणाघात






