Karad News : धारदार शस्त्राने वार करुन पत्नीचा खून; कराडमधील घटना; पती पोलिसांच्या ताब्यात
Karad News : कराड शहरात रविवारी रात्री कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने प्राणघातक वार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.

Karad News : कराड शहरातील डुबलनगर परिसरातील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये रविवारी रात्री कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Karad News)
याप्रकरणी पती दत्तात्रय नारायण जांभळे (वय ३५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रोहिणी दत्तात्रय जांभळे असे मृत पत्नीचे नाव आहे. घटनास्थळवरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री नऊ ते दहाच्या सुमारास दत्तात्रय व रोहिणी यांच्यामध्ये कौटुंबीक कारणातून वाद सुरू झाला. (Karad News)
या वादाचे पर्यावसान मारामारीत झाले. यावेळी दत्तात्रय याने धारदार शस्त्राने रोहिणी यांच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या रोहिणी यांचा मृत्यू झाला. (Karad News)
घटनेची माहिती मिळताच कराडच्या पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, निखिल मगदूम, अशोक भापकर यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, खुनामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. (Karad News)
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. संशयित पती दत्तात्रय जांभळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. (Karad News)





