Doctor’s Day Blog: ‘निरोगी हृदय हेच निरोगी जीवनाचे आधार स्थान’; डॉक्टर दिनानिमित्त डॉ. ज्योत्स्ना पाटील यांचा मोलाचा संदेश
Doctor's Day Blog : ताणतणाव, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि स्थूलता यामुळे हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढले

Doctor’s Day Blog: डॉक्टर्स डे निमित्त सर्व वैद्यकीय तज्ञ डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी आणि आरोग्य सेवेसाठी कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीस मनःपूर्वक शुभेच्छा!
दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा होणारा डॉक्टर दिन हा केवळ वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा केवळ गौरव करण्यासाठीचा दिवस नसून समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी त्यांच्या योगदानाची कृतज्ञतेने दखल घेण्याचा दिवस आहे. आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये हृदयरोग हा जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण बनला आहे. (Doctor’s Day Blog)
वाढता ताणतणाव, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि स्थूलता यामुळे हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत केवळ आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होण्यापूर्वी त्याचा प्रतिबंध करणे अधिक महत्त्वाचे ठरते, याच ध्येयाने पूना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरच्या संचालिका डॉ. ज्योत्स्ना पाटील गेली अनेक वर्ष प्रतिबंधात्मक हृदयरोग व्यवस्थापन पुनर्वसन आणि आधुनिक उपचारांच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहेत. (Doctor’s Day Blog)
हृदयरोग प्रतिबंधामध्ये नियमित आरोग्य तपासणी, जीवनशैलीतील सकारात्मक बदल, संतुलित आहार, नियमित व्यायाम, ताण तनाव व्यवस्थापन आणि जोखीम घटकांचे (Risk Factors) नियंत्रण यांना अत्यंत महत्त्व आहे. (Doctor’s Day Blog)
अनेक वेळा हृदयविकाराची लक्षणे दिसण्यापूर्वी शरीर इशारे देत असते, योग्य वेळी निदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते, हृदयाशी संबंधित असणाऱ्या अँजिओप्लास्टी बायपास यासारख्या शस्त्रक्रिया ही टाळता येऊ शकतात. (Doctor’s Day Blog)
पूना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरमध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी अत्याधुनिक आणि शस्त्रक्रिया विरहित उपचार सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामध्ये ईईसीपी (एक्स्टर्नल इनहास्ट काउंटर पल्सेशन) ई एस एम आर (एक्स्ट्रा कार्पोरियल शॉकवेव्ह मायोकाडियल रिव्हेस्क्युलरिझेशन) आणि एचबीओटी (हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी) यासारख्या प्रगत तंत्रज्ञान असणाऱ्या उपचारांचा समावेश केला आहे. (Doctor’s Day Blog)

Doctor’s Day Blog: ‘निरोगी हृदय हेच निरोगी जीवनाचे आधार स्थान’; डॉक्टर दिनानिमित्त डॉ. ज्योत्स्ना पाटील यांचा मोलाचा संदेश
हे उपचार हृदयांच्या स्नायूंना रक्तपुरवठा सुधारण्यास, छातीतील होणारा त्रास म्हणजेच अंजायना कमी करण्यास, व्यायाम क्षमता वाढवण्यास आणि जीवनमान सुधारण्यास उपयोगी ठरतात. (Doctor’s Day Blog)
याशिवाय हृदयविकारानंतरचे किंवा हृदय शस्त्रक्रियेनंतरही पुनर्वसन व्यायाम मार्गदर्शन, आहार सल्ला, वजन नियंत्रण, मधुमेह व रक्तदाब यांचे व्यवस्थापन यासारख्या सेवांद्वारे रुग्णांना दीर्घकालीन निरोगी जीवन जगण्यासाठी सक्षम केले जाते. प्रत्येक व्यक्तीला केवळ दीर्घ आयुष्य नव्हे तर निरोगी आणि सक्रिय आयुष्य मिळाले पाहिजे, असा डॉ ज्योत्स्ना पाटील यांचा मानस आहे. (Doctor’s Day Blog)
हृदयाची काळजी घेऊन आरोग्याला प्राधान्य देऊ या आणि प्रतिबंधात्मक “आरोग्यसेवेंचा जास्तीत जास्त स्वीकार करूयात कारण निरोगी हृदय हेच निरोगी जीवनाचे खरे आधार स्थान आहे “असा संदेश डॉक्टर दिनाच्या निमित्ताने डॉ ज्योत्स्ना पाटील यांनी दिला आहे. (Doctor’s Day Blog)
डॉ महेश शिंदे
पूना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर





